आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात 2550 महिलांनी केला गर्भपात!:1 एप्रिल 2022 पासूनची आकडेवारी, जीवाला धोका, अर्भकात विकृती असल्यास कायदेशीर अनुमती

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात 2550 महिलांनी त्यांच्या जीवाला धोका तसेच अर्भकात विकृतीसह बाळ नको असल्याच्या कारणांमुळे कायदेशीर गर्भपात केल्याचे वास्तव उजेडात आले आहे. जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसह शासनाद्वारे मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये कायदेशीर गर्भपाताची सोय आहे. याचा लाभ घेत जिल्ह्यात 1 एप्रिल 2022 पासून आजवर 2550 महिलांनी गर्भपात करून घेतला आहे.

महिलेची बाळाला जन्म देण्याची इच्छा नसेल तर गर्भपात करण्याची शासनाने अनुमती दिली आहे. यासाठी दाम्पत्याला काही नियमांची पुर्तता करावी लागते. अत्याचार पीडित महिलेलाही कायदेशीर गर्भपात करण्याचा शासनाने अधिकार दिला आहे. परंतु, गर्भपाताच्या सर्वच प्रकारांमध्ये 10 आठवडयांच्या आत गर्भपाताची परवानगी घेणे आवश्यक आहे. जर फारच जोखमीचे असेल व महिलेच्या जीवाला गर्भामुळे धोका असेल तर 24 आठवड्यापर्यंतही गर्भपात करता येतो, अशी माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

..तर गर्भपात करता येतो

''गर्भनिरोधक साधने वापरल्यानंतरही जर गर्भ राहिला असेल, महिलेची बाळाला जन्म देण्याची शारीरिक व मानसिक तयारी नसेल किंवा इच्छा नसेल तर कायदेशीर गर्भपात करता येतो. '' - डाॅ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्य चिकित्सक.

जीवाला धोका असल्यास केला जातो गर्भपात

''गर्भवती महिलेच्या जीवाला धोका असल्याचे तपाण्यांअंती निष्पन्न झाल्यास गर्भपात केला जातो. तसेच अर्भकामध्ये जन्मजात विकृती आढळल्यासही गर्भपात करता येतो.''-

डाॅ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी.

अत्याचार पीडितेची साक्ष नोंदवून गर्भपात करता येतो

अत्याचार पीडित महिलेला गर्भ राहिल्यास तिची पोलीसांपुढे साक्ष नोंदवून गर्भपात केला जातो. अशा प्रकारांमध्ये बहुतांशवेळा महिलांना बाळ नको असते. तशी इच्छा त्या लिहून देतात. त्यानंतर गर्भपाताची कारवाई सुरू केली जाते, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...