आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सद्भावना मार्च:‘वंचित’चा शांतता, सद्भावना मार्च; डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) येथून महामानवाच्या पुतळ्याला अभिवादन करून शांती मार्चला सुरुवात

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यासह राज्यात शांतता राखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी शांतता मार्च काढण्यात यावा, असे जाहीर केले. त्या पार्श्वभूमीवर शहर वंचितच्या वतीने शांतता, सद्भावना मार्च काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) येथून महामानवाच्या पुतळ्याला अभिवादन करून शांती मार्चला सुरुवात झाली.

सद्या शहरासह संपूर्ण राज्यात राजकारण तापले आहे. हनुमान चालिसा वाचन, भोंगे हटवा यावर समाजात तेढ निर्माण करण्याचे राजकारण सुरू आहे. त्याचा परिणाम हा सर्वसामान्य नागरिकांवर होता. तसेच यामुळे शहर, जिल्हा, राज्याची शांतता भंग होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने याकडे लक्ष देण्याचे काम करायला पाहिजे, अशी मागणी अॅड. आंबेडकर यांनी केली आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण राज्यात शांतता मार्च काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार १ मे महाराष्ट्र दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वंचितचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हारार्पण केले. तसेच मेणबत्ती पेटवून संपूर्ण शहरात शांती मार्च काढण्यात आला. या वेळी शहरातील नागरिकांनी शांतता राखावी, समता आणि बंधुता प्रस्थापित करावी, असा संदेश दिला.

या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष निशा शेंडे, जिल्हा महिला अध्यक्ष विद्या वानखडे, जिल्हा उपाध्यक्ष बाबाराव गायकवाड, शहर महासचिव प्रमोद राऊत, पुष्पा बोरकर, रमेश आठवले, सुरेश तायडे, सिद्धार्थ दामोधरे, अमरदीप खिराडे, शीलवंत खिराडे, विजय डोंगरे, कबीर रामटेके, वैभव रायबोले, अलंकार बागडे, अतुल वानखडे, अजय तायडे, पंडित कापसे, मिलिंद वार्धे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...