आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवघ्या काही दिवसांत नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहेत. शालेय साहित्याने बाजारपेठ सजली असून, पालकही साहित्य खरेदीसाठी दिसून येत आहे. दोन वर्षाच्या कालावधीनंतर यंदा पुन्हा शैक्षणिक साहित्य हे महागले असून, त्यामध्ये ३० टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. यात पेन, पेन्सिल, कंपासपेटी, दप्तर, पाटी, पुस्तक, गणवेश इतर साहित्याचा समावेश आहे. वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या पालकांच्या खिशाला शालेय साहित्य दरवाढीमुळे कात्री लागत आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दोन वर्ष ऑनलाइन शिक्षण सुरू होते. त्यावेळी दरवर्षीप्रमाणे शालेय साहित्याची विक्री झाली नाही. आता मात्र शालेय साहित्याला भरपूर मागणी आहे. वह्यांच्या निर्मितीसाठी कागदाचा दरांसह वाहतूक खर्च वाढला आहे. त्यासमवेत मजुरी, हमाली, वाहतूक यांसह अन्य खर्च वाढले आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि वाढलेला वाहतूक खर्च पाहता वह्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे श्री अष्टविनायक पेन हाऊस संचालकांचे म्हणणे आहे. वह्यांसह पेन, पेन्सिल, कंपास, स्कूल बॅग अशा शालेय साहित्याच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून येते.
दरवाढीबाबत श्रीकृष्ण बुक डेपो विक्रेते अमित भेले म्हणाले की, मागील दोन वर्षांपासून वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स, स्कूल बॅग किमतीत सातत्याने वाढ होत आहे. कच्च्या मालाचे भाव वाढल्याने नामांकित कंपन्यांनी दरवाढ केली आहे. पालक दर वाढीसाठी विक्रेत्यांना जबाबदार धरतात मात्र, उत्पादक कंपन्यांनी दरवाढ केल्याने विक्रेत्यांकडे पर्याय उरत नाही. दरवाढ झाल्याने साहित्य खरेदीनंतर सवलतीबाबत आवर्जून विक्रेत्यांकडे विचारणा होत आहे. दप्तराच्या किमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे. बाजारात दप्तरांची किंमत २५० ते आठशे रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तसेच सरकारी खासगी व इंग्रजी माध्यमांचे गणवेश वेगवेगळे असतात. कापड दुकानात मराठी शाळांचे गणवेश तीनशे ते सहाशे रुपयांपर्यंत तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या गणवेशाचे दर किमान ५०० ते ३ हजार रुपयांपर्यंत आहेत. गणवेशाच्या किमतीतही दुपटीने वाढ झाली आहे.
साहित्याचे यंदाचे दर
पेन १५ रुपये, १२ रुपये दराने वॉटर बॅग ७० ते ३३० रुपये, कंपास पेटी ७५ ते २०० रुपये पर्यंत, टिफिन बॉक्स ५० ते २५० रुपये, रेनकोट लहान मुले २०० ते ५५० रुपये असे दर आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.