आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:पाण्यापासून वंचित लोकांनी दिला उपोषणाचा इशारा; निवेदन वरूड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले

शेंदुरजनाघाट21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलजीवन सुरक्षा योजनेअंतर्गत अमडापूर येथे प्रत्येक घरी नळ कनेक्शन देण्याची मोहीम राबवली गेली. परंतु एक वर्ष लोटले तरीही अमडापूर येथील दलित वस्तीतील काही कुटुंबे आजही पाण्यापासून वंचित आहेत. अमडापूर येथील संबंधित नागरिकांनी लवकरात लवकर नळ कनेक्शन न दिल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. तसे निवेदन वरूड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.

कडक उन्हाळा असताना तेथील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. पाण्यासाठी शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडे विनवणी करावी लागते. वेळप्रसंगी लोकांच्या शिव्या खाव्या लागतात. विहिरीला पाणी नाही. लोकांनी ग्रामपंचायतकडे पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरची मागणी केली. पण ती सुद्धा पूर्ण केली जात नाही. सार्वजनिक विहिरीला पाणी असतानाही ग्रा.पं. संबंधित कुटुंबांना पाण्याचे नळ कनेक्शन देण्यासाठी टाळाटाळ करत आहे.

परिणामी यावर तत्काळ तोडगा न काढल्यास ग्रा. पं. कार्यालयापुढे उपोषण सुरू करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. निवेदन देताना बिरसा क्रांती दलाचे जिल्हा संघटक प्रा. कमलनारायण उईके, राजू गवई, सुनील गवई, चेतन वाडीवे, शामराव उईके, कुसुम कोकाटे, लक्ष्मी गवई, सिंधू काळबांडे, प्रल्हाद काळबांडे, हिराबाई सोमकुंवर, चंद्रशेखर काळबांडे व जानराव सोमकुंवर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...