आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांचे निर्देश:नळ जोडणीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : ठाकूर, पावसाळ्यापूर्वीच पूर्ण व्हावी पाणी टंचाई निवारण्याची सर्व कामे

अमरावती18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्यात उद्भवणारी पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी नळजोडणीचे उद्दिष्ट गाठणे आवश्यक आहे, असे सांगत त्यासाठी नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यक्रम आखावा. तसेच शासकीय यंत्रणांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून नवीन कामाचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे. प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करण्यात यावा. पावसाळ्यापूर्वी टंचाई निवारणाची कामे पूर्ण करण्यात यावी, असेही त्यांनी बजावले आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाई व जलजीवन मिशनचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अॅड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात बैठक आयोजित केली होती.

त्यावेळी त्या बोलत होत्या. आढावा बैठकीला आमदार राजकुमार पटेल, बळवंतराव वानखडे, देवेंद्र भुयार व प्रताप अडसड, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, मोर्शीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी मंदार पत्की, उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गाव योजनेंतर्गत ज्या गावांचा प्रस्ताव अद्याप सादर झाला नाही, त्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करावा. मोर्शी तालुक्यातील खानापूर व पिपळखुटा गावातील टंचाईची स्थिती लक्षात घेता या दोन्ही गावांचा समावेश सत्तर गाव योजनेत करून घ्यावा. जिल्ह्यातील कुठल्याही गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई होता कामा नये, असे निर्देशही ठाकूर यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत ११० कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असून, त्यात ८६१ गावांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेकडे पाणीपुरवठा विषयक ५ कोटींच्या योजना आहेत. काही गावांचा समावेश यात करून घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले आहे. प्रारंभी ६२४ गावांमध्ये प्रस्तावित कामे सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...