आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:मनपा आरोग्य विभागातील 29 जणांना कायम नियुक्ती

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विभागातील अस्थायी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनपा प्रशासक डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी बुधवार १ रोजी कायम नियुक्तीचे आदेश वितरित केले. त्यावेळी या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता.

हे अधिकारी, कर्मचारी गेल्या १० ते १५ वर्षांपासून मनपाच्या आरोग्य विभागात अस्थायी तत्त्वावर कार्यरत होते. नगर विकास विभागाच्या १ डिसें.२०२१ च्या शासन निर्णयानुसार त्यांना कायम नियुक्ती देण्यात आली.

या कार्यक्रमाला मनपा कर्मचारी संघाचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल, कार्याध्यक्ष मानविराज दंदे, उपाध्यक्ष कमलाकर जोशी, आकाश तीरथकर, उपायुक्त सा. डॉ‌. सीमा नैताम, मुख्य लेखाधिकारी डॉ‌. हेमंत ठाकरे, वैद्यकिय अधिकारी डॉ. विक्रांत राजुरकर, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, स्त्री वैद्यकिय अधिकारी डॉ. स्वाती कोवे, डॉ. पौर्णिमा उघडे, कार्यक्रम व्यवस्थापक वर्षा गुहे, लेखापाल संजय बागडे, पीएचएन विलास नकाशे, मधुसूदन निर्मळ, उमा शिंदे, अर्चना ठवकर, एनएएम योगिता भगत, मिनाश्री हंगरे, उमा ठाकूर, सीमा डोंगरे, ज्योती दिग्रसे, दीपा खिराडे, आरती बोरंगमवार, शीला परतेती, स्मिता इंगळे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...