आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंशोधन प्रवृत्तीला बळ देणाऱ्या पीएचडीच्या पूर्व परीक्षेत (एम-पेट) केवळ 15 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेसाठी एकूण 5 हजार 281 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ 799 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची ही टक्केवारी अवघी 15.12 टक्के आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पीएचडी सेलतर्फे गेल्या 27 नोव्हेंबरला ही परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर अवघ्या काहीच दिवसांत म्हणजे आज, बुधवारी या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला. या निकालानुसार केवळ 799 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सामान्य ज्ञानावर आधारित एक आणि पदव्युत्तर शिक्षणावेळी घेतलेल्या विषयांपैकी एक असे दोन पेपर या परीक्षेसाठी ठेवण्यात आले होते. दरम्यान निकाल घोषित केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रके इ-मेलद्वारे पाठविली आहेत.
पीएचडीसाठीच्या परीक्षेसाठी विद्यापीठाच्या पाचही जिल्ह्यात 11 केंद्रे उघडण्यात आली होती. सर्वाधिक 5 केंद्रे अमरावती जिल्ह्यात होती. याशिवाय बुलडाण्यात 3, यवतमाळात 2 आणि अकोला व वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी एक केंद्र उघडण्यात आले होते. सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 3 ते 5 अशाप्रकारे दोन फेऱ्यांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेतील संपूर्ण प्रश्न वस्तुनिष्ठ (एमसीक्यू) होते आणि ते संगणकाचा वापर करुन ऑनलाईन सोडवायचे होते. त्यामुळे एकूण परीक्षार्थ्यांना दोन फेऱ्यांमध्ये विभागून घ्यावे लागले होते, असे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे.
… म्हणून विद्यार्थी संख्या अधिक
विद्यापीठ प्रशासनाच्या मते नवे शैक्षणिक धोरण (एनइपी) अंमलात आल्याने एम-पेट चे स्वरुपही बदलणार आहे. तर दुसरीकडे संशोधक विद्यार्थ्यांच्या मते यापुढे एम-पेट ऐवजी दुसरा पर्याय निवडावा लागणार असल्याने यावेळी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एम-पेटचा अर्ज दाखल केला होता. नोंदणी ५२८१ असली तरी प्रत्यक्षात 3 हजार 732 संशोधक विद्यार्थीच परीक्षेला प्रवीष्ट झाले. 1 हजार 549 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलीच नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.