आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदर्शन:शासनाच्या विकासात्मक योजनांवर आधारित छायाचित्र प्रदर्शन; माहिती व जनसंपर्क विभागाचे आयोजन, ५ मेपर्यंत प्रदर्शन

अमरावती16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने दोन वर्षात राबवलेल्या विविध विभागाच्या विकासात्मक योजनांवर आधारित ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ हे छायाचित्र प्रदर्शन माहिती व जनसंपर्क विभागातर्फे आयोजित करण्यात आले. शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहातील आर्ट गॅलरीत ५ मे पर्यंत दररोज सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे.

या छायाचित्र प्रदर्शनात विविध योजनांची माहिती चित्रांद्वारे देण्यात आली आहे. प्रदर्शनाला प्राध्यापक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोविडसह इतर नैसर्गिक आपत्तींना राज्य शासनाने समर्थपणे तोंड दिले आहे.

या दरम्यान शासनाने राबवलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, यासाठी प्रदर्शनात शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, जलसिंचन, क्रीडा, आरोग्य, नागरी सुविधा, सामाजिक न्याय, आदिवासींचा विकास, वस्त्रोद्योग, रस्ते, वीज, कला, संस्कृती संवर्धन आदी विकासात्मक योजनांच्या माहितीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या प्रदर्शनाला शहरातील नागरिक, साहित्यिक, प्राध्यापक, विद्यार्थ्यांसह सर्वांचाच उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...