आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्थानिक महात्मा फुले कला वाणिज्य व सीता रामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयाचा रसायनशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी. व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अग्नि सेनानी दिनाच्या निमित्ताने एक दिवसीय अग्निसुरक्षा कार्यशाळा (मॉकड्रिल) पार पडली.
कार्यशाळेच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश चौधरी होते. तर रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख व या कार्यशाळेचे संयोजक डॉ. राजेश गणोरकर, अग्निसुरक्षा अधिकारी हर्षल दहाट प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख वक्ते दहाट यांनी विद्यार्थ्यांना आग लागण्याची कारणे व आगी पासून बचाव कसा करावा, खुर्च्या, टेबल आणि डेस्कशिवाय मोठ्या प्रमाणात ज्वलनशील असलेले प्रयोगशाळेतील द्रवपदार्थ कसे हाताळायचे, याची माहिती दिली. अशा ठिकाणी लागलेली आग लवकर नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे महाविद्यालयांमधील अग्निसुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, याची आठवण त्यांनी करुन दिली.
प्रास्ताविक कार्यशाळेचे आयोजन सचिव प्रा.वैभव गुल्हाने यांनी केले. कार्यक्रमाला अग्निसुरक्षा अधिकारी दहाट यांचे सहयोगी बबलु नरहरे व चमू, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. अतुल वंजारी, प्रा. सतीश कोलटके, डॉ. प्रियंका बेलसरे, डॉ. रुपाली तळेगावकर यांच्यासह महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.