आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंचवटी चौक ते शेगाव नाका परिसर रस्त्यावर कचऱ्यांची ढिगारे असल्याने सर्वत्र घाण व दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, सहा दिवसांच्या आत कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अन्यथा मनपा आयुक्तांना घेराव घालण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेनेने निवेदनातून दिला आहे.
शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात कचरा साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. मनपा प्रशासन याकडे डोळे झाक करीत आहे. मनपा प्रशासनाला वारंवार तक्रारी केल्या आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय पंचवटी चौक ते शेगाव नाकापर्यंत जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचून दुर्गंधी पसरलेली असल्याचे शिवसेना गाडगेबाबा नगर शाखेचे म्हणणे आहे. तसेच रस्ता साफसफाई करणारे कर्मचारी गेल्या २ महिन्यांपासून बेपत्ता असल्याने या मुख्य रस्त्याला घाणेरडे स्वरूप आले आहे.
त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मनपा आरोग्य अधिकारी यांना घेराव घालून संताप व्यक्त केला. तसेच येणाऱ्या पाच ते सहा दिवसांत कार्यवाही न झाल्यास थेट मनपा आयुक्तांना घेराव घालण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी शाखा अध्यक्ष प्रदीप बाजड, महेंद्र शेंडे, प्रमोद देशमुख, अमोल कंकाळे, दिलीप काकडे, संजय पिंजरकर, अरुण शेळके, वैभव हरणे, अजय जामोदकर, चिराग वासंकर, अजिंक्य शेंडे, आकाश वाकोडे, अजय बोबडे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.