आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्त पदांचे ग्रहण:सांगा, आगीच्या घटना आटोक्यात येणार कशा, नागरिकांचा सवाल; एक फायरमन, 4 मदतनिसांच्या भरोशावर अचलपूर ‘अग्निशमन’चा डोलारा

परतवाडा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती जिल्ह्यातील एकमात्र ‘अ’ वर्ग नगर परिषद म्हणून अचलपूर नगरपालिकेचा समावेश असताना या पालिकेच्या अधिनस्त असणाऱ्या अग्निशमन विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. प्रशासक व प्रशासनाकडून ही रिक्त पदे भरल्या गेली नाहीत. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरणा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र,त्याला दीड वर्ष लोटून अद्याप देखील कंत्राटी कर्मचारी भरण्यात आले नाहीत. रिक्त पदांचे हे ग्रहण सुटेल की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

अचलपूर नगरपालिका क्षेत्रासह नजीकच्या मेळघाट, चांदूर बाजार, दर्यापूर, अंजनगाव तालुक्यातील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्याकरिता अचलपूर अग्निशमन विभाग महत्त्वपूर्ण ठरतो. त्यामुळे अग्निशमन विभागात कर्मचाऱ्यांची नियुक्ती अत्यंत आवश्यक आहे.

१ लाख १३ हजार लोकसंख्या असणाऱ्या या शहरात नगर परिषद संचालनालयाच्या स्थायी निर्देशाप्रमाणे अग्निशमन विभागात अग्निशमन अधिकारी १, अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक १, लिडींग फायर मन २, ड्रायव्हर कम ऑपरेटर ४, फायर मन ६, प्रशिक्षित मदतनीस ७ अशा २१ पदांची आवश्यकता एका अग्निशमन वाहना करिता आवश्यक आहे. सध्या पालिकेत तीन अग्निशमन बंब कार्यरत आहेत. मात्र, एका अग्निशमन बंबाकरिता लागणारे कर्मचारी कार्यरत नाही.

तीन वाहनांकरिता स्थानिक अग्निशमन पर्यवेक्षक १, वाहनचालक प्रभारी २, फायर मन २, मदतनीस ५, असे एकुण १० कर्मचारी कार्यरत आहेत. एकाच वेळी आगीच्या घटना अनेक ठिकाणी झाल्यास आग आटोक्यात आणणे कठीण होते. नुकताच कांडली येथे झालेल्या घटनेत या कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम केले असले, तरी कर्मचाऱ्यांअभावी या विभागाला अनेक अडचणी निर्माण होत आहे. शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अग्निशमन विभाग सक्षम करणे गरजेचे आहे. जणेकरून उन्हाळ्याच्या या दिवसात आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळू शकेल.

बातम्या आणखी आहेत...