आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवानिमित्त पोलिस अधिकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम:पोलिसांनी स्वीकारले श्री गणेशाचे पालकत्व; प्रत्येक मंडळाची जबाबदारी एकेका अधिकाऱ्याकडे

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची संकल्पना तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी गुरुनाथ नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रमेश आत्राम व त्यांच्या सहकाऱ्यांनी गणेशोत्सवानिमित्त एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण औटे व सुमिता चोरघे, पोलिस उपनिरीक्षक शुद्घोदन नितनवरे, सुनील साबळे, शरद सारसे तसेच पोलिस अंमलदार सहभागी झाले असून श्री गणेशाचे पालकत्व असे या उपक्रमाचे ब्रीद आहे.

अडचणी दूर करणार

उपक्रमांतर्गत पोलिस स्टेशन हद्दीत गणेश स्थापनेपासून ते गणेश विसर्जनापर्यंत गणेश मंडळ व पोलिस प्रशासन यांच्यामध्ये योग्य समन्वय साधल्या जात असून पोलिस स्टेशन हद्दीत स्थापन झालेल्या सर्वच सार्वजनिक श्री गणेशांचे पालकत्व पोलिस विभागाने स्वीकारले आहे. या नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि पोलिस यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली असून वातावरण सौहार्दपूर्ण बनले आहे. दरम्यान गणेशोत्सवात काही अडचणी असल्यास प्रत्यक्ष पालकत्व स्वीकारलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करावी, असे ठाणेदारांनी स्पष्ट केले असून त्या तत्काळ दूर करण्याचा प्रयत्न पोलिस विभागाकडून केला जात आहे.

गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला

दैनंदिन कामकाज आटोपून दर्यापूर पोलिस स्टेशनमधील अधिकारी व अंमलदार हे श्रींच्या आरतीसाठी लागणारे साहित्य हार, फुले, प्रसाद घेऊन ठिकठिणाच्या गणेश मंडळात उपस्थित राहतात. नव्हे ते आमचे कर्तव्य असून ते पूर्ण करण्याचा मनस्वी आनंद मिळतो, अशा त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. अर्थात ज्या संकल्पनेतून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला, त्याचे वास्तव चित्र दर्यापूर शहर व ग्रामीण परिसरात दिसून येत आहे. कोरोना सारख्या महाभयंकर साथीचा रोग दूर झाल्याने दोन वर्षानंतर जनतेत गणेशोत्सवाबाबत मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. सणासुदीच्या काळात वेळ मिळत नसल्याने पोलिसांना श्रींची आराधना करण्याची संधी मिळत नाही. या उपक्रमामुळे श्रींची आराधना करण्यास पोलिस प्रशासनालाही वेळ काढता आला असून त्यांच्यात एक वेगळे चैतन्य निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...