आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:वरुड येथे घरफोडी करणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात

शेंदुरजना घाट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुड शहरात राहत असलेल्या प्रशांत भोसले यांच्या घरात चोरी करून मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.घटनेच्या वेळी भेसले हे कुटुंबियांसह काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्या वेळी अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याचे कुलुप तोडून कपाटातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, मोबाईल, सायकल असा एकूण ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता.

या प्रकरणी तक्रार दाखल करताच पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली होती. पोलिसांनी तपासाचे चक्र गतीमान करत वरुड येथे वैभव निस्वादे, शुभम अरुण कपले या दोघांना या चोरी प्रकरणातील लॅपटॉप विक्रीकरिता बसस्थानक परिसरात आले असता सापळा रचून ताब्यात घेतले असता, त्यांनी चोरीची कबूली देत अन्य गुन्ह्यांचीही कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून १ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधीक्षक शशीकांत सातव, तपन कोल्हे, यांच्या नेतृत्वात संतोष मुदाने, रविंद्र बाने, बळवंत दाभने, दिनेश कनोजिया, पंकज फाटे, संदीप नेवारे, राजु मडावी, विनोद पवार, सागर भापड, रितेश वानखडे, शिवा सिरसाट यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...