आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत हरणाची शिकार:मांस विक्री करणाऱ्यासह खरेदी करणाऱ्या चौघांना वनविभागाने पूर्णानगरमध्ये ठोकल्या बेड्या

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील पूर्णानगर परिरातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या तीन कामगारांनी हरणाचे मांस आणले, ते शिजवले आता त्याची भाजी करून जेवण करायची तयारी सुरूच असतानाच अमरावती वनविभागाच्या पथकाने धाड टाकून त्या तीन कामगारांसह त्यांना मास विक्री करणाऱ्यासह चौघांना अटक केली आहे. ही कारवाई वनविभागाच्या पथकाने शुक्रवारी केली आहे. अटक केलेल्या चौघांचीही मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

चौघांना वनविभागाने ठोकल्या बेड्या

रामेश्वर श्रीराम धांडेकर, सुरेश बुडा कास्देकर, संजू राजू कास्देकर आणि आकाश ओंकार ईटके या चौघांना अटक केली आहे. या चौघांनाही 16 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. रामेश्वर, सुरेश आणि संजू हे तिघेही पूर्णानगर परिसरातील एका वीटभट्टीवर कामगार आहेत. या तिघांनी हरणाचे मास विकत आणल्याची माहिती अमरावती वनविभागाच्या पथकाला शुक्रवारी दुपारी मिळाली होती. या माहीतीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने धाड टाकून या तीन कामगारांना व नंतर त्यांना मास विक्री करणाऱ्या आकाश ईटके याला पकडले.

रात्री टाकला छापा

वनविभागाच्या पथकाने कामगारांच्या झोपडीवर धाड टाकली, त्यावेळी त्यांनी हे मांस शिजवले होते. मात्र भाजी तयार व्हायची होती. त्यावेळी हे मांस जप्त करून आकाश ईटकेला ताब्यात घेण्यासाठी पथक पूर्णानगरमध्ये पोहचले. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याने सांगितले की, सदर मास हे हरणाचे आहे. शेतात कुत्र्याने हरिणाची शिकार केली होती. त्यानंतर ते मला दिसले व नंतर मी मृत हरण विळ्याने कापून विक्री केले. ते हरणच असल्याचे आकाशने सांगितले आहे मात्र, तरीही वनविभाग जप्त मासांची पडताळणी करणार आहे. आकाशने या तिन्ही कामगारांना दीड किलो मांस विक्री केले होते. 200 रुपये प्रतिकिलोने मास विक्री केल्याचे समोर आले असून वनविभागाने ते जप्त केले आहे.

3 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद

हरीण हे शेड्युल - 3 टाईपमध्ये असल्यामुळे त्याची शिकार, विक्री गुन्हा असून वन्यजीव सरंक्षण अधिनियम 1972अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अशा गुन्ह्यांमध्ये 3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. तसेच हरणाची शिकार किंवा हरिणाच्या मासांची विक्री राखीव वनक्षेत्रात झाल्यास 3 ते 7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. मात्र, हा गुन्हा राखीव वनक्षेत्रात घडला नाही, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे,

फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणार

आकाशच्या सांगण्यानुसार सदर मास हरणाचे आहे, ते मास तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणार आहे. हरणाची शिकार करणे किंवा कापणे किंवा विक्री करणे गुन्हा असल्यामुळे कारवाई केली आहे. आरएफओ​​​​​​ वर्षा हरणे यांनी अशी माहिती दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...