आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील अमरावती-अकोट मार्गावर मालवाहू वाहनातून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी गुरूनाथ नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रमेश आत्राम यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने गुरूवारी (दि. 16) सकाळी पावणेसातच्या सुमारास मुर्तीजापूर टी-पाईंटसमोर सापळा रचला. दर्यापूरमार्गे अकोटकडे जाणाऱ्या दोन मालवाहु बोलेरो पिकअप वाहनांची तपासणी केली असता, त्यात प्रत्येकी 7 अशी एकूण 14 जनावरे निर्दयतेने कोंबून असलेली आढळली.
पोलिसांनी जनावरांना जीवनदान देत त्यांची रवानगी गोरक्षणमध्ये केली. या प्रकरणी पोलिसांनी सैय्यद अहफाज सैय्यद अबरार (22) व अवेसुद्दीन सलामहुद्दीन (22) दोघेही रा. माना, जि. अकोला यांना अटक केली. कारवाई दरम्यान पोलिसांनी अंदाजे 2 लाख 94 हजारांची 14 जनावरे व 15 लाख 44 हजारांची दोन मालवाहू वाहने जप्त केलीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.