आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचा हस्तक्षेप:युवक काँग्रेसचा भाजप कार्यालयाकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला; काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डिटेन

अमरावती9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी कोणतेही तथ्य समोर दिसत नसताना विनाकारण केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करून खासदार सोनिया गांधी व राहुल गांधी तसेच इतरही काँग्रेसी नेत्यांना विनाकारण मोदी सरकार त्रास देत आहे. या विरोधात शनिवारी युवक काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर हल्ला बोल आंदोलन पुकारले. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे आंदोलन होऊ शकले नाही, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी राजकमल चौक येथेच अडवून डिटेन केले. तसेच दुसरीकडे या मोर्चाचे प्रतिउत्तर देण्यासाठी भाजप कार्यालयावर भाजप समर्थक उभे होते. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस पुन्हा समोरासमोर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते दुपारच्या सुमारास मोदी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजप कार्यालयावर निघाले असता पोलिसांनी त्यांना राजकमल चौक येथे अडविण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डिटेन करण्यात आले.

यात जिल्हा शहर अध्यक्ष निलेश गुहे, अकोला ग्रामीण जिल्हा अध्यक्ष निनाद मानकर, परीक्षित जगताप, अक्षय हेटे, फिरोज शाह, योगेश बुंदेले, केतन रेवतकर, अनुराग भोयर, विवेक गावंडे, वैभव देशमुख, संदीप शेंडे, मनोज इंगोले, रितेश पांडव, अनिकेत ढेंगळे, अक्षय साबळे, अंकुश जुनघरे, लुकेश केने, प्रमोद बगळे, सौरभ किरकटे, आदित्य पाटील, गुड्डू हमीद, अक्षय निचित, आशिष शिंदे आदींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...