आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Police 'joint Operation' On Madhya Pradesh Maharashtra Border | 2 States, 80 Policemen, Action Against 26 Liquor Distilleries In 8 Hours, 26 Lakh Worth Of Goods Seized

मध्यप्रदेश-महाराष्ट्राच्या सीमेवर पोलिसांचे ‘जॉइन्ट ऑपरेशन’:2 राज्य, 80 पोलिस, 8 तासांत दारुच्या 26 हातभट्टींवर कारवाई

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्ट्या सुरू होत्या. या भट्ट्यांवर स्वतंत्रपणे कारवाई करणे महाराष्ट्र किंवा मध्यप्रदेश यापैकी कोणत्याही एका पोलिस घटकाला शक्य नव्हते. त्यामुळे शनिवारी (दि. 27) सकाळी सहा वाजतापासून दोन्ही राज्यांचे पोलिस मिळून 9 अधिकारी व 71 अंमलदार असे एकूण 80 जणांच्या पथकाने या भागात कारवाई करून गावठी दारुच्या 26 भट्टी नष्ट केल्या. यावेळी तयार दारू व दारूसाठी आवश्यक असलेला सळवा व ईतर मुद्देमाल असा एकूण 26 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज जप्त करून नष्ट केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी आणि शिरजगाव कसबा या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्द मध्यप्रदेशच्या सीमेला लागून आहे. मध्यप्रदेशातील खोमई व आठनेर या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्द येतात. गावठी दारू काढणारे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या अगदी सीमेवर भट्टी लावतात. कोणत्याही एका पोलिसांनी कारवाईचा प्रयत्न केला तर अवघ्या काही वेळातच ते भट्टी सोडून महाराष्ट्राचे पोलिस गेले तर मध्यप्रदेशच्या सीमेत जातात आणि मध्यप्रदेश पोलिस आले तर महाराष्ट्राच्या सीमेत येतात.

दारूची भट्टी नष्ट

त्यामुळे कायदेशीर कारवाई करताना पोलिसांना अडचणी येतात. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यामुळे अमरावती पोलिस व मध्यप्रदेश पोलिसांनी शनिवारी सकाळपासून संयुक्तरित्या करवाई करण्याचे ठरवले. त्यामुळे अमरावती एलसीबी, शिरजगाव कसबा, ब्राम्हणवाडा थडी येथील पोलिसांसह मध्यप्रदेशातील खोमई व आठनेर पोलिस ठाण्यातील असे एकूण 70 अंमलदार व 9 अधिकाऱ्यांचे पथक या परिसरात पोहचले. सकाळी 6 वाजतापासून एक-एक करून या भागात सुरू असलेल्या 26 गावठी दारुच्या भट्टी पोलिसांनी नष्ट केल्या. यावेळी काही भट्टी रनिंग होत्या तर काही भट्टींवर गावठी दारुचा साठा तयार होता.

पाच जणांवर कारवाई

पोलिसांनी हा माल नष्ट करून पाच जणांवर कारवाई केली आहे. ही कारवाई अमरावतीचे एसपी अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत सात यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ अतुल नवगिरे, एपीआय धोंडगे, एपीआय पंकज दाभाडे व पथकाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...