आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुव्यवस्था कायम:कायदा, सुव्यवस्थेसाठी धारणीसह धामणगावात पोलिसांचा रुट मार्च

धारणी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सण, उत्सवांच्या काळात शहर आणि ग्रामीण भागात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता, सुव्यवस्था कायम रहावी, या उद्देशाने शहरातून पोलिसांचा नुकताच रुट मार्च काढण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौदार्य वृद्धींगत व्हावा यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी गोहर हसन, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र बेलखडे यांच्या नेतृत्वात धारणी शहरातून रुट मार्च काढण्यात आला.

अमरावती-बऱ्हाणपूर या आंतरराज्यीय महामार्गावर पोलिस जवानांचा शस्त्र रुटमार्च काढण्यात आला. त्याचे नेतृत्व एसडीपीओ गोहर हसन, ठाणेदार सुरेंद्र बेलखडे, पीएसआय सुयोग महापुरे, करुणा मोरे, रिना सदार, विलास राठौड, गुप्तहेर प्रमुख अनिल झारेकर यांनी केले. धामणगाव रेल्वे शहरात दत्तापूर पोलिसांचे पथसंचालन

धामणगाव रेल्वे| गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी दत्तापूर पोलिसांकडून शहरात पथसंचलन करण्यात आले. गणेश मंडळांनी शांतता राखून गणेश उत्सव साजरा करावा, असे आवाहन या वेळी ठाणेदार श्याम वानखडे यांच्या वतीने करण्यात आले.

उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात दत्तापूर पोलिसांकडून गणेश चतुर्थीच्या अगोदरपासूनच शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांवर पथसंचालन करून मार्केट चौक, अमर शहीद भगतसिंग चौक, महात्मा गांधी चौक, सिनेमा चौक, लालबहादूर शास्त्री चौक परिसरातून रुटमार्चने मार्गाक्रमण केले. शहरातील गणेश मंडळांनी कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही काळजीपूर्वक लक्ष देणे, गणेश मंडळांचा शहरातील वाहतुकीस अडथळा होवू नये व गणेशोत्सवादरम्यान शांतता राखण्याचे आवाहन

या वेळी दत्तापूरचे ठाणेदार श्याम वानखडे यांच्याकडून करण्यात आले. पोलिसांच्या पथसंचलनाने परिसरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ठाणेदार वानखडे यांच्या उपस्थितीत दत्तापूर पोलिस स्टेशन येथे गणेश मंडळांच्या बैठकी आयोजित करण्यात आल्या. या वेळी एसडीपीओ जाधव यांनी मार्गदर्शन केले. एसडीपीओ जाधव यांच्या मार्गदर्शनात निघालेल्या पोलीस पथसंचलनात ठाणेदार श्याम वानखड, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र बारड, पोउनि विष्णुपंत राठोड, प्रियंका चौधरी व दत्तापूर पोलिस दलाच्या २५ कर्मचाऱ्यांसह शीघ्र कृती दलाचे १८ जवान व होमगार्ड सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...