आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्रप्रदेशातून अमरावतीत 168 किलो गांजांची तस्करी:पोलिसांनी पकडला 26 लाखांचा गांजा, पाच जणांना बेड्या, दोन कारही जप्त

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्रप्रदेशातून अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात​​ कारमधून होणाऱ्या गांजाच्या तस्कारीचा भांडाफोड अमरावती ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला. पोलिसांनी तब्बल 26 लाखांचा 168 किलो गांजा जप्त केला असून ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्री केली.

पहिलीच एवढी मोठी कारवाई

प्राथमिक माहितीनूसार, जप्त करण्यात आलेला गांजा जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी पाठवला जाणार होता. याची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केल्याची ही जिल्ह्यात अलीकडच्या काळातील पहिलीच कारवाई आहे.

यांना झाली अटक

आश्लेष गजानन साठे (रा. बिलानपूरा, अचलपूर), हरिष ऊर्फ शुभम अनिल मडावी (रा. खिडकीगेट, अचलपूर), वसिम शहा गुड्डू शहा (रा. नेरपिंगळाई, ता. मोर्शी), ओंकारसिंग ऊर्फ अंकुश गणेशसिंग चंदेल (रा. फरमानपूरा, अचलपूर) आणि गजानन रमेश वानखडे (रा. नेरपिंगळाई, मोर्शी) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

सापळा रचून कारवाई

शुक्रवारी आंध्रप्रदेशमधून मोठ्या प्रमाणात गांजा घेवून दोन कार जिल्ह्यात येणार असल्याची माहीती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. या माहीतीच्या आधारे एलसीबीचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांनी तीन स्वतंत्र पथक तयार केले. हे पथक तिवसा ते मोर्शी मार्गावर विवीध ठिकाणी सापळा रचून बसले होते. याच दरम्यान शुक्रवारी सांयकाळी 5 ते 6 वाजताच्या सुतारास याच मार्गावरील सातरगावजवळ दोन संशयित कार पोलिसांना दिसल्या. या कार पोलिसांनी पकडल्या व तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 168 किलो गांजा असल्याचे समोर आले.

23 पोलिस 6 तास कारवाई

पोलिसांनी या कारमधील पाच जणांना अटक करुन त्यांच्या ताब्यातील दोन कार व 168 किलो गांजा असा सुमारे 26 लाख 60 हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे, तिवसा ठाणेदार संदीप चव्हाण, एपीआय रामेश्वर धोंडगे, पीएसआय सुरज सुसतकर, नितीन चुलपार, एएसआय मुलचंद भांबुरकर, नंदलाल लिंगोटे, सुनिल महात्मे, बळवंत दाभने, रविन्द्र बावने, युवराज मानमोठे, उमेश बुटले, मंगेश लकडे, सैय्यद अजमल, स्वप्नील तंवर, निलेश डांगोरे, उमेश वाकपांझर, दिनेश कनोजिया, पंकज फाटे, प्रविण अंबाडकर, हर्षद घुसे, संदीप नेहारे, प्रविण चव्हाण या 23 अधिकारी व अंमलदारांच्या तीन पथकाने सांयकाळी 6 वाजतापासून सुरू केली होती. ही कारवाई शुक्रवारी उशिरा रात्री 12 वाजेपर्यंत सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...