आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील एकूण १४ तालुक्यातील २५७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होणार आहे. सकाळी ७.३० वाजता ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. तसेच २० डिसेंबरला तालुकानिहाय तहसील कार्यालय येथे मतमोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने मतदानाचा दिवस व मतमोजणीचा दिवस २० डिसेंबर या दिवशी महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१) अन्वये मद्यविक्री करण्यास मनाई केली असून, कोरडा दिवस (ड्राय डे) जाहीर केला आहे. उपरोक्त कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत दारुबंदी राहील, असे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केले आहे.
मतमोजणी ठिकाणच्या नगरपालिका व नगर परिषद क्षेत्रातील सर्व कार्यरत अबकारी अनुज्ञप्त्या, दुकाने मतमोजणी कार्यक्रम संपेपर्यंतच्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.