आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयुष्य जगण्यासाठी सकारात्मकता महत्त्वाची असते. कार्यशाळेतून सकारात्मक ऊर्जा मिळाल्याने चांगले वाटले. शिकवताना मलाही एक वेगळा आनंद मिळाला, परंतु ज्यांना मी दोन दिवस प्रशिक्षण दिले, त्यांना काय वाटते, त्यांनी काय अनुभवले हे ऐकताना मला अधिक आनंद होईल, असे प्रतिपादन अभिनेत्री शर्वरी जमेनिस यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रादर्शिक कला विभागाच्यावतीने आयोजित नृत्य शैलीतील खलनायकावर आधारित गतभाव या विषयावर दोन दिवसीय कथ्थक कार्यशाळेचा नुकताच समारोप झाला. त्या प्रसंगी कार्यशाळेतील अनुभव व्यक्त करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कार भारतीचे अमरावतीचे क्षेत्रीय प्रमुख अजय देशपांडे, प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री शर्वरी जमेनिस, प्रादर्शिक कला विभागाचे समन्वयक आर. एम. जाधव, नृत्यशास्त्र विभागाचे डॉ. मोहन बोडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात अजय देशपांडे म्हणाले, कलावंत हा साधना करीत असतो. मग ती कोणतीही कला असो. कला ही सातासमुद्रापार घेऊन जाते. कलेला कोणतेही बंधन नसते, असे म्हणून त्यांनी कलावंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अल्पावधीतच प्रादर्शिक कला विभागाला सर्व सोयीयुक्त दालन नृत्याकरीता तयार करण्यात आलेले आहे. याचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि प्रवेश घ्यावेत, असे आवाहन केले. पुढच्या वर्षी सुध्दा अशाच प्रकारे कथ्थक नृत्यातील विविध घटकांवर कार्यशाळा घेण्यात येतील, असे समन्वयक आर. एम. जाधव यांनी सांगीतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा गाडगे, तर आभार प्रा. प्रियंका जोशी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. मोहन बोडे, डॉ. अनंत देव, प्रा. अमोल अढाव, अनिल पानबुडे, सुनील उज्जैनकर, प्रा. विद्या सावळे, प्रा. प्रियंका जोशी, अमृता जटाळे, राजेश बोडे, विश्वनाथ निळे, राजू इंगोले, रसिका जोशी, रचना गरीबे, वैशाली इंगोले तसेच सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थिनींच्या नृत्याने केले मंत्रमुग्ध
या प्रसंगी प्रशिक्षणार्थी वैभवी बोडे, किर्ती डोंगरकर व पूजा देव यांनी उपस्थित मान्यवरांसमोर नर्सिंग बोडे यांच्या रचनेवर तराणा हा शास्त्रीय नृत्याचा प्रकार उत्तमरित्या सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी तबल्यावर शैलेंद्र बोडे, हार्मोनियमवर हेमंत बोडे यांनी साथसंगत दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.