आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुजवलेल्या खड्ड्यातून काँक्रिट बाहेर:राजकमल रेल्वे पुल; 100 मीटरच्या रस्त्यावर 50 पेक्षा अधिक लहानमोठे खड्डे

अमरावती20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य मार्गांमध्ये समावेश होणाऱ्या रेल्वे स्टेशन ते राजकमल, जयस्तंभ रेल्वे पुल मार्गावरील खड्डे सध्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलावरील सुमारे 100 मीटरच्या या रस्त्यावर 50 हून अधिक लहान मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यापैकी काही खड्डे तर 2 फुट, 5 फुट व्यासाचे असून 6 ते 7 इंच खोल आहेत.

जयस्तंभ चौक व हमालपूराच्या दिशेने शिक्षक सहकारी बँकेजवळ फुटपाथलगत असलेले खड्डे वाहनचालकांसाठी अतिधोकादायक ठरत आहेत. मात्र, संबधित यंत्रणेची याकडे सपशेल डोळेझाक होत असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.

खड्ड्यांमधून बाहेर पडलेली बारीक खडी. त्यामुळे अपघाताचा धोका बळावला असून खड्डे चुकविण्यासाठी वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.
खड्ड्यांमधून बाहेर पडलेली बारीक खडी. त्यामुळे अपघाताचा धोका बळावला असून खड्डे चुकविण्यासाठी वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.

शाळकरी मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात खडीवरुन घरसलो अन् जखमी झालो!

रेल्वे पुलावरून जात होतो. शाळकरी मुलीने खडीपासून बचावण्यासाठी सायकलचे ब्रेक मारले. त्यावेळी आम्ही शाळकरी मुलीला वाचण्याच्या प्रयत्नात दुचाकीचे इमर्जन्सी ब्रेक लावले. त्यामुळे आमची दुचाकी घसरली. कारण त्या ठिकाणी खडी पसरली आहे. आमच्या मागून आलेले एक वाहनसुध्दा याच प्रकारे इमर्जन्सी ब्रेकींगमुळे त्याचवेळी त्याच ठिकाणी अनियंत्रीत झाले. या अपघातात माझ्यासह माझे मित्र जखमी झाले होते, असे दुचाकीस्वार श्रीकांत आसटकर यांनी सांगितले आहे.

रेल्वे स्टेशन चौकाकडून हमालपुऱ्याकडे जाताना फुटपाथलगत वळणावर पडलेल्या या खड्ड्याची काही दिवसांपुर्वीच डागडुजी केली होती. मात्र त्यातील क्राँक्रिट बाहेर पडत असून त्याच्या मागेपुढे खड्डा पडत आहे.
रेल्वे स्टेशन चौकाकडून हमालपुऱ्याकडे जाताना फुटपाथलगत वळणावर पडलेल्या या खड्ड्याची काही दिवसांपुर्वीच डागडुजी केली होती. मात्र त्यातील क्राँक्रिट बाहेर पडत असून त्याच्या मागेपुढे खड्डा पडत आहे.

वाहनावरील नियंत्रण सुटते

वाहनचालक दिनेश चव्हाण यांनी सांगितले की, रेल्वेपुल मार्गावर असलेले खड्डे जीवघेणे ठरत आहे. हा शहरातील मुख्य वर्दळीचा मार्ग असल्यामुळे वाहनांची नेहमीच गर्दी राहते. यातच या ठिकाणी खड्डे व खडी पसरली असल्यामुळे ते वाचवण्याच्या नादात वाहनावरील नियंत्रण सुटते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...