आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎:वीज खंडित; महावितरणच्या‎‎ वरिष्ठ तंत्रज्ञाला मारली थापड‎

अमरावती‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीजपुरवठा काुणी खंडित केला, आताच्या‎ आता माझ्या घरचा वीजपुरवठा सुरू करा,‎ असे जोरजोरात ओरडणाऱ्या एकाने‎ महावितरणच्या एका वरिष्ठ तंत्रज्ञाला‎ थापड मारली. तसेच कार्यालयात जाऊन‎ खुर्च्यांची फेकाफेक केली आणि तक्रार‎ पुस्तक फेकून दिले. ही घटना पन्नालाल‎ बगिचा वीज वितरण तक्रार निवारण‎ केंद्राच्या कार्यालयात घडली. या घटनेच्या‎ तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी १० मार्चला‎ दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा‎ निर्माण केल्याच्या कलमान्वये गुन्हा‎ नोंदवला आहे.‎ मनोज बाळासाहेब पोटे (४५, रा.‎ पार्वतीनगर) असे तक्रारदार वरिष्ठ तंत्रज्ञांचे‎ नाव आहे. मनोज पोटे हे पन्नालाल बगिचा‎ वीज वितरण केंद्रावर वरिष्ठ तंत्रज्ञ या‎ पदावर कार्यरत आहेत. ते ९ मार्चला‎ कार्यालयात कर्तव्य बजावत असताना दोन‎ अज्ञात व्यक्ती कार्यालयात पोहोचले.

माझ्या‎ घरचा वीजपुरवठा कुणी खंडित केला, असे‎ म्हणून त्यांनी मनोज‎ पोटेंशी वाद घातला आणि त्यांच्या‎ कानशिलात लगावली. त्यानंतर त्या‎ व्यक्तींनी कार्यालयातील खुर्च्यांची‎ फेकाफेक करून तक्रार बुक फेकून दिले.‎ या घटनेनंतर मनोज पोटे यांनी राजापेठ‎ पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यांच्या‎ तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा‎ दाखल केला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...