आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन:पीआर कार्ड लाभार्थी पोहोचले जिल्हा कचेरीवर ; लाभार्थ्यांना पीआर कार्ड देण्याची भाजपची मागणी

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडाळी प्रभागातील नागरिक पीआर कार्ड पासून वंचित राहिले आहेत. शासकीय जमिनीवरील अतिक्रमित नागरिकांना त्यांच्या नावावर जमिनीचे पट्टे वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी भाजप माजी नगरसेविका पंचफुला चव्हाण यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात २०११ पर्यंत शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे द्यावे, असे शासकीय आदेश काढण्यात आले. यामुळे पंतप्रधान आवास योजनेचा लाभ या गरीब कुटुंबातील नागरिकांना होऊन त्यांच्या मालकीचे पक्के घर मिळण्याचे स्वप्न पूर्ण होणार होते. त्यामुळे हजारो झोपडपट्टी लाभार्थ्यांनी पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले होते. मात्र, जमीन पट्टे नावावर न झाल्याने अनेकांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. याला शासकीय यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच माजी नगरसेविका पंचफुला चव्हाण यांनी यासाठी बेमुदत उपोषणही केले होते. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. मात्र, अजूनही वडाळी प्रभागातील नागरिकांना पीआर कार्ड देण्यात आले नाही. वडाळी गावठाण, बीबी नगर, प्रबुद्ध नगर, भरत नगर, अशोक वाटिका, महादेव खोरी, आशियाना परिसर, अण्णाभाऊ साठे नगर, बेनोडा प्रभागातील बेनोडा झोपडपट्टी आदींचा समावेश आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना तत्काळ पीआर कार्ड देण्यात यावे, अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा माजी नगरसेविका पंचफुला चव्हाण यांच्या नेतृत्वात निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी संजय चव्हाण, छोटू पाटील, प्रफुल्ल बोके, राहुल भोसले, संजय कदम, रामदास धागोरकर, धनराज बेनीवाल, नंदलाल गायकवाड, गणेश बेनिवाल, रहीम मिर्झा, सुशीला खिल्लारे, शोभा दांडेकर, इंदिरा नागमोते, शोभा पाचपोर, ललिता गजभिये, मीरा भुजाडे, शकील अली, अमजद सय्यद, सुलोचना बावनकर, संतोष कोलते, विजू सोनार, प्रतिभा अवसरे, पुष्पा तातड, मीना ठाकरे, संतोष बेनिवाल, फुलसिंग गोसावी, सुनील मोहनकर, धनराज बेनीवाल, विजय पाटील, मंगला बेडेकर, प्रफुल्ल बगडे, पूनम खंडारे, संतोष पाटील, कमला गायकवाड, चंद्रभान सहारे, राजीव पवार, पुष्पा घोरमाडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...