आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीआर कार्ड:फेरफार अदालतीत दिले नागरिकांना पीआर कार्ड; जमिनीसंबंधी प्राप्त तक्रारींचा जागीच निपटारा करण्यासाठी या कार्यालयाने या फेरफार अदालतीचे आयोजन

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातर्फे मौजे बडनेरा परिक्षेत्रातील वरुडा, जेवड व वडद येथील नागरिकांच्या प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यामुळे संपत्तीचे मिळकत प्रमाणपत्र (पीआर कार्ड) मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. जमिनीसंबंधी प्राप्त तक्रारींचा जागीच निपटारा करण्यासाठी या कार्यालयाने या फेरफार अदालतीचे आयोजन केले होते.

सदर भागातील नागरिकांची शेकडो प्रकरणे भूमी अभिलेख कार्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. त्यापैकी सुमारे १२५ अर्जदारांनी फेरफार अदालतीला हजेरी लावली. त्यापैकी ५३ प्रकरणांचा निपटारा कार्यालय स्तरावर करण्यात आला, असे भूमीअभिलेखचे उपअधीक्षक अनिल फुलझेले यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. दरम्यान, काही प्रकरणे कागदपत्रांच्या त्रुटीमुळे पूर्ण होऊ शकली नाही.

परंतु या मालमत्ता धारकांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ती यथावकाश पूर्ण केली जातील. फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी विशाल गुडधे, आकाश नागदिवे, नीलेश कारंजकर, चंदू गोळे, सुनील कळमकर, नितीन ठाकरे, शीतल सराड यांनी यासाठी अर्जदारांना मदत केली. या उपक्रमामुळे जनतेला दिलासा मिळाला असून ‘फेरफार जनतेच्या दारी’ उपक्रमाखाली पुढील आठवड्यात बडनेरा भागात फेरफार अदालत घेण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...