आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारंभ:प्रभात हायस्कूलचे मुख्याध्यापक दिलीप‎ बुरांडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार‎

शेंदुरजनाघाट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुसला येथील प्रभात हायस्कूलचे‎ मुख्याध्यापक दिलीप बुरांडे हे नुकतेच निवृत्त झालेत.‎ त्यानिमित्त त्यांचा निवृत्ती निरोप व सत्कार समारंभाचे‎ शाळेच्या वतीने आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी एकता ग्रामीण व शहरी विकास‎ बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ डोंगरे हे होते. या‎ प्रसंग प्रमुख पाहुणे म्हणून मनोज खेरडे, पुसला येथील‎ सरपंच धनराज बमनोटे, योगेश डोंगरे, प्रतिभा वाघाडे,‎ मुकुल चपटे, मयूर बेलसरे, अंकुश बंुदे उपस्थित होते.‎ या वेळी दिलीप बुरांडे यांचा संस्थेच्या वतीने शाल व‎ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी‎ नवनिर्वाचित मुखाध्यापक नांदने यांना पुढील‎ वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन गजानन‎ सिरसाट यांनी केले. आभा प्रफुल्ल खेरडे यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...