आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भव्य नगर कीर्तन:गुरु नानक देवजी यांचा प्रकाश पर्व उत्सव 8 नोव्हेंबर रोजी होणार साजरा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिख पंथाचे प्रेरणादायक, महान व प्रथम गुरु श्री गुरुनानक देव महाराज यांचा ५५३ वा प्रकाश पर्व उत्सव येत्या ८ तारखेला मोठ्या उत्साह व श्रद्धेने साजरा केला जाणार आहे. राजापेठ बुटी प्लॉट येथील श्री गुरुसिंघ सभा येथे प्रकाश पर्व उत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा होणार आहे. येत्या १ ते ८ नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे, अशी माहिती मंगळवारी गुरुद्वारा श्री गुरुसिंघ सभेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदत दिली.

गुरु नानक देवजी यांचा जन्मदिवस दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा होत असतो. या वर्षी श्री गुरुनानक देवजी यांचा ५५३ वा प्रकाश पर्व उत्सव ८ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. गुरुद्वारा गुरुसिंघ सभा अमरावतीद्वारा १, २ व ३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता श्री सुखमणी साहेब व आसा दी वार यांचे संपूर्ण कीर्तन होणार आहे. ४ तारखेला भव्य नगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गुरुनानक देवजी यांच्या विचारांचे कीर्तन, गायन होणार आहे. यातून शहरात त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार केला जाणार आहे. नगर कीर्तन दुपारी दोन वाजता गुरुद्वारा श्री गुरुसिंघ सभा बुटी प्लॉट येथून निघणार आहे.

यानंतर नगर कीर्तन राजापेठ, राजकमल चौक, श्याम चौक, बापट चौक, सरोज चौक, जयस्तंभ चौक, सिटी कोतवाली, श्याम चौक, राजकमल चौक मार्गे रात्री आठ वाजता पुन्हा गुरुद्वारा पोहोचणार आहे. नगर कीर्तनमध्ये काचेची पालखी राहणार आहे. यावेळी पत्रपरिषदेला श्री गुरुसिंघ सभा अध्यक्ष गुरबिंदर सिंघ बेदी, कार्याध्यक्ष राजेंद्रसिंघ सलुजा, सचिव डॉ. निक्कू खालसा, कोषाध्यक्ष अमरज्योत सिंघ जग्गी, बिट्ट सलूजा, दिलीप सिंघ बग्गा, महासचिव विक्की पोपली, सोनू बग्गा, राजेंद्रसिंघ छाबडा, हरविंदरसिंघ राजपूत, अमरजित सिंग जुनेजा, अजिंदरसिंघ मोंगा, तजीन्दर सिंघ उबोवेजा आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...