आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामान्सूनपूर्व गारपिटीतही वादळी पावसाने १ जून रोजी शहरातील मूर्तिजापूर रोड स्थित बेकायदेशीर व अपरिपक्व असलेल्या वैभव मंगल कार्यालयातील दोन सभागृहाचे टिनशेड उडाले तसेच भिंतींचा काही भाग कोसळून लग्न सोहळ्यातील ४० पेक्षा जास्त वऱ्हाडी जखमी झाले होते. दरम्यान, जखमींना नुकसान भरपाई व कार्यालय संचालकांवर कारवाई करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली होती.
मात्र स्थानिक प्रशासकीय अधिकारी आठवडा लोटूनही एकमेकांकडे बोट दाखवण्यातच धन्यता मानत आहे. अखेर वधूची आई माला सोळंके यांनी बुधवारी (दि. ८) सायंकाळी उशीरा स्थानिक पोलिसात दिलेल्या लेखी तक्रारीवरून विविध कलमान्वये वैभवाचे संचालक राजेश खंडेलवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मुळात वैभव मंगल कार्यालय नसून, धान्य साठवणुकीचे वेअरच हाऊस म्हणूनच सद्य स्थितीतही त्याची अधिकृत नोंद आहे.
याची कल्पना संचालक राजेश खंडेलवाल यांना होती, तसेच मंगल कार्यालयास लागणाऱ्या किंवा उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा, व्यवसायाचा परवाना, नोंदी आदी नसल्याचे धक्कादायक वास्तव घटनेनंतर आता समोर आले आहे. मागील ४ वर्षांपासून नियमबाह्य पणे मंगल कार्यालय म्हणून नावारूपास असतानाही बुकिंग करणाऱ्यांना दिलेल्या पावतीवर सुद्धा वैभव एजन्सी हे नाव आढळून आले. खोडाखोड करून कार्यालयाच्या नावे देण्यात आलेली पावती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.