आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील कोथरूड येथे १० ते १४ जानेवारी दरम्यान ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे पुण्याचे महापौर मुरलीअण्णा मोहोड यांचा पुढाकाराने आयोजन होत आहे. स्पर्धेच्या तयारीचा राज्य कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष खा. रामदास तडस, उपाध्यक्ष डाॅ. संजय तीरथकर, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. भरघोस पुरस्कार हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण आहे.
६० लाखाची रोख पारितोषिके, ,प्रत्येक वजन गटात सुवर्ण पदकासह बुलेट मोटारसायकल, २० वजन गटात २० बुलेट, महाराष्ट्र केसरी बहुमान पटकावणाऱ्याला थार महेंद्रा कंपनीची कार, ५ लाख रु. रोख व चांदीची गदा तसेच उपविजेत्याला रोख २.५ लाख, ट्रॅक्टर पुरस्कारस्वरूप दिला जाईल. प्रत्येक गटातील उपविजेत्या पहिलवानाला २५ हजार रुपये, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्याला १५ हजार रु. दिले जातील.
त्याचप्रमाणे ७० हजार प्रेक्षक बसण्याची व्यवस्था व खेळाडूंना खेळण्यासाठी तीन मेट मॅच व्यवस्था व माती विभागासाठी दोन लाल मातीचे मैदान असे एकूण पाच मैदाने राहतील. सुमारे १ हजार पहिलवान, ११० पंच, १०० पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कुस्ती स्पर्धा होणार आहे. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटनाला प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ,महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष खा. रामदास तडस व १४ जानेवारी रोजी अंतिम लढतीसह पुरस्कार वितरण समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री गिरीश महाजन हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्याच्या दृष्टीने विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. खेळाडूंसाठी उत्तम राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती पंचम विदर्भ केसरी व परिषदेचे उपाध्यक्ष डाॅ. संजय तीरथकर यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.