आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राथमिक केंद्राची आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांअभावी कोलमडली:ग्रामीण रुग्णालय वर्षभरापासून शासन दरबारी अडकले

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत डिसमेंटला आलेली आहे. या आरोग्य केंद्रावर शहरासह परिसरातील 5 ते 6 गावांच्या आरोग्याची जबाबदारी आहे. मात्र अद्यापही तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत.

या संबंधित प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतत वरिष्ठस्तरावर पाठपुरावा केला. मात्र रिक्त पदे न भरल्याने अन्य कर्मचाऱ्यांवरच आरोग्य सेवेचा डोलारा उभा आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी कोलमडलेल्या आरोग्य सेवेबाबत रुगणांनी संताप व्यक्त केला आहे.

अद्यापही हालचाली नाही

प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय एक वर्षापुर्वी मंजुर करण्यात आले. त्याच्या इमारत बांधकामासाठी कोट्यवधींचे अंदाजपत्रक व नकाशाला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती वर्षभरापुर्वी आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली होती, मात्र अद्यापही त्या संदर्भात कोणत्याही हालचाली दिसून येत नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. येथील कर्मचाऱ्यांना रहाण्यास देण्यात आलेल्या क्वॉर्टरचीदेखील दुरावस्था झाल्याने कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे आकस्मिक सेवेपासून रुगणाला वंचित राहण्याची वेळ येते.

ही परिस्थिती भविष्यात उद्भवू नये म्हणून मंजूर करण्यात आलेल्या 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे काम त्वरित सुरू करावे, तसेच रिक्त पदेही भरण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

स्थगिती उठताच होईल कामाला सुरूवात

शेंदुरजनाघाट येथील मंजुर ग्रामीण रुग्णालयाला सध्याच्या शासनाने स्थगिती दिली असल्यामुळे त्या कामाची प्रक्रिया थांबली आहे. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून ते याबाबत सकारात्मक आहे. स्थगिती उठवल्यानंतर त्या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण होवून कामाला सुरूवात होईल.

-देवेंद्र भुयार, आमदार

वरिष्ठांकडे सुरू आहे पाठपुरावा

प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांबाबत मागील वर्षभरापासून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. पदे मंजूर होताच ती भरण्यात येतील, अशी माहिती शेंदुरजनाघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन कुऱ्हाडे यांनी दिली.

ही पदे आहेत रिक्त

या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण 15 पदे मंजू आहेत. त्यापैकी औषध निर्माण अधिकारी 1, सहाय्यक परिचारिका 4, परिचारक पुरुष 1, सफाई कामगार 1 अशी एकूण 7 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी आली आहे.

बातम्या आणखी आहेत...