आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचार्य कॉ. शिवदास उटाणे यांचे निधन:मार्क्सवादाचे गाढे अभ्यासक, शिस्तप्रिय प्राध्यापक म्हणून ओळख; उद्या अंत्यसंस्कार

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदूर रेल्वे येथील अशोक महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य तथा मार्क्सवादाचे गाढे अभ्यासक शिवदास संपतराव उटाणे यांचे आज सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी (ता. ३१) दुपारी १२.३० वाजता भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील.

कम्युनिस्ट विचारांवर निष्ठा

उटाणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, जावाई, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. भंडारा जिल्ह्यातील कान्हळगाव हे त्यांचे मूळ गाव आहे. सध्या ते मोहाडी येथे वास्तव्यास होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षात त्यांनी विविध पदे भूषवली आहे. त्यांनी आपली हयात कम्युनिस्ट विचारांसाठी वाहून घेतली. भाकपचे सरचिटणीस दिवंगत कॉम्रेड अर्धेन्दूभूषण बर्धन, राज्य सचिव दिवंगत कॉ. गोविंद पानसरे, सध्याचे केंद्रीय सचिव कॉ. डॉ. भालचंद्र कानगो यांच्यासह अनेक बड्या नेत्यांसोबत त्यांनी काम केले आहे.

शिस्तप्रिय प्राध्यापक

कम्युनिस्ट पक्ष व या पक्षाच्या विविध जनसंघटनांच्या शिबिरांमध्येही त्यांच्या खांद्यावर प्राचार्यपदाची जबाबदारी असायची. चांदूर रेल्वे येथे असताना एक शिस्तप्रिय प्राध्यापक, प्राचार्य असा त्यांचा लौकीक होता. ते इंग्रजी विषय शिकवत असतं. त्यांचा निधनाने भारतीय कम्युनिस्ट पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली, या शब्दात पक्षाचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.

बातम्या आणखी आहेत...