आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त कारकीर्द:मुख्याधिकारी वानखडे यांची वर्षभरातच बदली ; नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी

दर्यापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गतवर्षी ९ सप्टेंबर रोजी येथे रुजू झालेले मुख्याधिकारी पराग वानखडे यांची वर्षभरातच बदली झाली असून त्यांच्या जागी नंदू परळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मंगळवारी सकाळी पदभार स्वीकारला. परळकर हे यवतमाळ जिल्ह्यातील कळंब नगरपंचायतीतून येथे आले आहेत.

पराग वानखडे यांची वर्षभराची कारकीर्द बरीच वादग्रस्त ठरली. रुजू झाल्यानंतर कार्यालयात पुर्ण वेळ उपस्थित न राहणे, त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबणे, विविध कामाच्या फाईली पेंडीग राहणे, फोन न उचलणे, मनमानी व पक्षपात करणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण तसेच या-ना त्या कारणाने ते सतत चर्चेत येत वादग्रस्त ठरले होते. याचीच दखल त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान येथील मुख्याधिकारी हा मुख्यालयी वास्तव्य करणारा असावा. तो अमरावती राहणारा नसावा यासाठी तत्कालीन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी २५ मार्चंला उपविभागीय अधीकारी मनोज लोणारकर यांना निवेदन दिले होते. अखेर त्यांच्या बदलीचे आदेश उशिरा रात्री येऊन धडकले.

दरम्यान राज्यातील सत्ताबदलानंतर वादग्रस्त मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्या बदलीची चर्चां राजकीय गोटात व शहरातील चौका-चौकात सुरु झाली आहे. शिवसेनेचे काही पदाधिकारी अलिकडेच शिंदे गटात सहभागी झाले असून त्यांच्यामुळेच या बाबीला पूर्णत्व आले, अशीही चर्चा आहे. दरम्यान नवीन मुख्याधिकारी म्हणून यवतमाळ जिल्यातील कळंब नगरपंचयतीचे मुख्याधिकारी नंदु परळकर सोमवारी सकाळी कार्यालयीन वेळेत रुजू झाले.

बातम्या आणखी आहेत...