आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅरेथाॅन शर्यतीचे आयोजन:अर्ध मॅरेथाॅन साठी पुरस्काराची रक्कम 5  लाखापर्यंत वाढवली

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था, तुषार भारतीय मित्रमंडळ आणि जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने रविवार २५ डिसेंबर रोजी स. ६ वाजता राज्यस्तरीय २१ कि.मी. अटल दौड अर्ध मॅरेथाॅन शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. आधी या स्पर्धेत एकूण पुरस्कार रक्कम ही ३ लाखाहून ५ लाखापर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती आयोजक तुषार भारतीय यांनी अटल दौड श्रीनिवास काॅम्प्लेक्स, राजकमल चौक येथे दुपारी २.३० वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या अर्ध मॅरेथाॅनमध्ये मोठया संख्येत नामांकित खेळाडू सहभागी होणार असून पुरुष, महिला, विद्यार्थी व खुला अशा विविध गटांसाठी वेगवेगळ्या अंतराची ही स्पर्धा होणार आहे. प्रवेश घेण्यास इच्छुक धावकांसाठी https://ataldaud.com या अधिकृत वेब पोर्टलवर नोंदणी करता येईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजक तुषार भारतीय, माजी महापौर चेतन गावंडे व उपस्थित इतरांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...