आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन:मिळकतीच्या मूल्यांबाबत मुद्रांक शुल्क ठरवण्याची प्रक्रिया ऑनलाइन

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिळकतीचा योग्य बाजारभाव ठरवण्याच्या प्रक्रियेत त्याचे मुद्रांक शुल्क निश्चित करण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज प्राप्त होतात. ही प्रक्रिया १ ऑगस्टपासून ऑनलाइन करण्यात आली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागाद्वारे ई-अभिनिर्णय प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे यापुढे अभि निर्णय प्रकरणे ऑनलाइन अर्जाद्वारे दाखल करण्याचे आवाहन सहज जिल्हा निबंधक किशोरकुमार मगर यांनी केले आहे. ऑनलाइन प्रणालीची विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज दाखल केल्यावर त्याची प्रिंट घेऊन सह जिल्हा निबंधक कार्यालयात ३० दिवसांत सादर करावी. अर्जात त्रुटी किंवा इतर नोटीस असल्यास ऑनलाइन माहिती मिळणार आहे. नागरिकांना ऑनलाइन अर्ज करताना कोणतीही अडचण आल्यास मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा निबंधक किशोरकुमार मगर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...