आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहागाव : छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात युवासेनेचा ‘थाळीनाद’
महागाव | महागाईच्या विरोधात युवासेनेचो आदित्य ठाकरे व वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने रविवार, दि. ३ एप्रीलला राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सागर देशमुख युवासेना विभागीय सचिव व दिलीप घुगे यांच्या आदेशावरून युवासेना यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने महगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे युवासेनेने थाळीनाद आंदोलन केले. केंद्र सरकारने सत्तेवर येण्या अगोदर जनतेला महागाई कमी करण्यासंदर्भात मोठमोठी आश्वासने दिली होती. परंतू सद्य:स्थितीत केंद्र सरकारला याचा विसर पडलेला आहे. ज्या पद्धतीने कोरोना पळवून लावण्यासाठी थाळी वाजवण्याचा कयास लावला होता. त्याप्रमाणे थाळी वाजवल्यानंतर तरी कमी मोदींना महागाई पळवून लावण्याची सद्बुद्धी लाभावी, यासाठी व केंद्र सरकारने वाढविलेल्या महागाईचे अभिनंदन करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ज्येष्ठ शिवसैनिक तथा नगरसेवक रामराव पाटील नरवाडे, युवासेना जिल्हाप्रमुख विशाल प्रकाश पांडे, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे, तालुका संघटक रवींद्र भारती, युवासेना तालुका प्रमुख राम तंबाखे, शहरप्रमुख ओम कुसंगवार, शहर संघटक समाधान कदम, गजानन शिंदे, सुमित गोविंदवाड, ओम घोडे, राजू पवार, विनोद पराते, विनोद घोडे, शंकर टेटर, नितीन मेटकर, विवेक चव्हाण, दिनेश वाघमारे, गोकुळ भद्रे, गोपाल दातकर, ऋषिकेश मुधोळ, राधेश्याम सुर्यवंशी, पवन राठोड आदी युवा सैनिक उपस्थित होते.
घाटंजी : पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात युवासेना आक्रमक
घाटंजी । वाढत्या महागाईच्या विरोधात देशातील मोदी सरकार यांचा निषेध कार्यक्रम युवासेनेच्यावतीने शहरात घेण्यात आला. सर्वसामान्य माणसाचं जगणं या महागाईने कठीण करून टाकलं जगाव की मरावं अशी परिस्थिती या महागाईमुळे निर्माण झालेली आहे. याचा निषेध म्हणून युवा सेना शिवसेना महिला आघाडी विधानसभा युवा अधिकारी आकाश राठोड यांच्या नेतृत्वामध्ये निषेध आंदोलन घेण्यात आले आहे. आंदोलनामध्ये तालुका प्रमुख नीलेश चव्हाण तालुका संघटक ,शिवसेना प्रशांत मस्के युवा सेना तालुका प्रमुख, राहुल आडे उपतालुका प्रमुख, संतोष घेनावत उपतालुकाप्रमुख, सागर खडसे विभाग प्रमुख दिलीप राठोड पार्टी सर्कल अरुण राठोड शिवनी सर्कल संजय जाधव शाखाप्रमुख उपस्थित होते.
दिग्रस : केंद्र सरकार विरोधात थाळीनाद आंदोलन करून निषेध
दिग्रस | वाढत्या महागाई बद्दल केंद्र सरकार विरोधात युवा व विद्यार्थी सेनेतर्फे रविवार,दि.३ एप्रिल २०२२ रोजी ११ वाजता छत्रपती शिवाजी चौक येथे थाळी व ताली आंदोलन करून निषेध केला. महागाईबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करण्याकरिता थाळी, ताली बजाव आंदोलन पुकारले यामध्ये थाळी व ताली वाजवत केंद्र सरकारच्या विरोधात फलक लावून घोषणाबाजी करीत निषेध करण्यात आला. यामध्ये युवा सेना तालुका प्रमुख जॉकी राठोड, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख ललित राठोड,युवा सेना शहर प्रमुख दिनेश खाडे, कैलास तायडे,प्रवीण चव्हाण, दिंगाबर चव्हाण, निशांत बनसोड,तुषार जाधव, नीलेश मस्के, अनिरुद्ध राठोड, उमेश चव्हाण,गोपाल राठोड, पंकज राठोड, गणेश चव्हाण, मनोहर राठोड, मनीष पवार, संतोष राठोड, अभिजित काळे, गजानन जाधव, रोहित पवार, अमोल राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कळंब : छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकवटले युवासेनेचे कार्यकर्ते.
कळंब । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवासेना जिल्हा समन्वयक अभिषेक सुरेशराव पांडे यांच्या नेतृत्वात दि. ३ एप्रिलला आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक मांडवकर, विजय चव्हाण, पुरुषोत्तम वाढरे, लखन मस्कर, अक्षय धोटे, शुभम एकोणकर, जनार्धन रोकडे, करण मून, मनोज माईदे, अक्षय गायकवाड, शुभम रोहनकर, निखिल किंनगावकर, अखिलेश साळवे, राहुल चावरे, शुभम निशानदार, शुभम उचाडे, गौरव येवले, वैभव कुबडे, विशाल अढाळ, पंकज देशमुख, प्रशिक भवरे, अनिकेत तुळसकर, प्रज्वल धनुस्कर, आकाश गायकवाड, शिवा गावंडे, अभि साळुंके, शारदा थोटे, प्रध्या भवरे, रविना शिरस्कार आदी उपस्थित होते.
आर्णी : युवासेनेकडून इंधन दरवाढीविरोधात ‘थाली बजाओ, खुशिया मनाओ’ आंदोलन
आर्णी । शहरातील पेट्रोल पंपावर इंधन दरवाडी विरोधात रविवार दि. 3 एप्रिलला आर्णी युवासेनेकडून थाली बजाओ, खुशिया मनाओ हा अनोखा आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्य तेल, यासह अनेक पदार्थाचे वाढते दर यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहे. केंद्र सरकारच्या महागाई धोरणा विरुद्ध घोषणा देत, केंद्र सरकारचा निषेध करत थाली बजाओ, खुशिया मनाओ म्हणत पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख पवन वाघमारे, रामेश्वर जाधव, आनंद शिंदे, गोकुळ शेगर, किरण पत्रे, भारत पवार, वैभव इंगोले, गणेश बोक्से, दत्ता कोलते, वैभव पवार, विश्वनाथ खापकर, सुदर्शन इंगोले, नानू राठोड, सौरव रावते, युवराज देवकर आदी उपस्थित होते.
बाभूळगाव : युवासैनिकांनी वाटले ‘अच्छे दिन’चे गाजर
बाभुळगाव | राळेगाव विधानसभा क्षेत्रातील बाभुळगाव येथे रविवार, दि. ३ एप्रिल रोजी युवा सैनिकांच्या वतीने वाढत्या महागाई बद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करण्याकरता थाळी बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी सामान्य जनतेला केन्द्र सरकारच्या वतीने अच्छे दिन चे गाजर वाटप करण्यात आले. या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खासदार भावना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या आदेशानुसार, युवासेना पश्चिम विदर्भ विभाग सचिव सागर देशमुख व युवासेना विस्तारक दिलीप घुगे यांच्या सूचनेनुसार, युवासेना जिल्हा प्रमुख डॉ.प्रसन्न रंगारी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यात हे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी तालुका प्रमुख मनोज भुजाडे, शहर प्रमुख अतिष तातेड उपस्थित होते. याशिवाय राळेगाव तालुक्यात तालुका प्रमुख अमोल राऊत यांनी व कळंब तालुक्यात समनव्यक अभिषेक पांडे यांच्या नेतृत्वात थाळी बजाओ आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.