आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्यपूर्व काळात इतरांची पत्रकारिता हीभारताला स्वातंत्र मिळवून देणारी होती तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता हीसमाजासाठी स्वातंत्र्य मागणारी होती. समाजस्वातंत्र्य असेल तर राजकीय आणि इतरस्वातंत्र्याला अर्थ आहे, असे बाबासाहेब म्हणतात.जनसमर्थन पत्रकारिता हा प्रकार केवळ तथ्य सांगतनाही, तर तथ्य मांडताना एक वेगळा दृष्टिकोन त्यातथ्यांबाबत देत असतो, अशी पत्रकारिता ही डाॅ.आंबेडकर यांनी केली. केवळ बातम्या देण्याचे कामबाबासाहेबांच्या पत्रकारितेने केले नाही तर त्याचेपरिणाम देशात व जगात कसे होणार आहेत हेदेखील स्पष्ट केले होते. त्यामुळे डाॅ. आंबेडकर हेजगाच्या पातळीवर पहिले जनसमर्थक पत्रकारठरतात, असे प्रतिपादन प्रा. संजय घरडे यांनी केले.
श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित तक्षशीला महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी सुरू केलेल्या मूकनायक वृत्तपत्राला १०३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मूकनायक दिन तथा आंबेडकरी पत्रकारिता दिन जनसंवाद विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र आणि रासेयोच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. या निमित्त एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जनसमर्थन पत्रकारिता या विषयावर प्रा. संजय घरडे यांनी विचार व्यक्त केले. पत्रकारिता म्हणजे व्यक्तीने किंवा संपादकाने घेतलेली स्वयंदीक्षा होय. त्यासाठी विशिष्ट ध्येयाने प्रेरित होणे आवश्यक असते, असे बाबासाहेब म्हणाल्याचे देखील त्यांनी सांगितले.
मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता आणि नंतर प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे कशी काढली याचेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. प्रास्ताविक प्रा. राजरत्न मोटघरे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. आशिष कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. अमित त्रिवेदी, प्रा. विलास फरकाडे, प्रा. बबनराव इंगोले, प्रा. डॉ. रेखा पर्वतकर, प्रा. सुनीता श्रीखंडे, डॉ. सनोबर कहेकशा, डॉ. प्रणाली पेटे, प्रा. ममता कळकमकर, प्रा. प्रीतेश पाटील, डॉ. आनंद देशमुख, प्रा. सुभाष मुंढे, प्रा. महेश बनसोड, प्रा. नंदू अढाऊ, प्रा. स्वप्निल गवई यांच्यासह मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.