आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविदर्भ राज्य आंदोलन समितीची जिल्हा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत प्रा. डॉ. कुमार बोबडे यांना विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या जिल्हा प्रसिद्धिप्रमुख पदी नियुक्त करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार प्रा. प्रभाकर कोंडबत्तुनवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. कुमार बोबडे हे सद्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या जनसंवाद विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहे.
याचवेळी रेखा माहोरे यांची नांदगाव खंडेश्वर तालुका सचिवपदी, विकी मुंडे यांची फुलआमला गाव प्रमुखपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल रंजना मामर्डे, राजेंद्र आगरकर, दिलीप भोयर, प्रकाश लढ्ढा, सुषमा मुळे, डॉ. विजय कुबडे, सरला सपकाळ, हर्षा सगणे, रियाज खान, सुनील साबळे, प्राचार्य अरविंद मंगळे, ज्ञानेश्वर लसणापुरे, महेश डेहनकर, राजेश राणे, पांडुरंग बिजवे, देवेंद्र रेखाते, दीपक कथे, लक्ष्मणराव वानखडे, मोहन ठाकरे, विनायक इंगोले, राजाभाऊ पुसदेकर, साहेबराव इंगळे, प्रवीण महाले, अक्षय माहोरे, अशोक नाईक आदींनी या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.