आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादुर्भाव:गायी, म्हशी शहराबाहेर नेण्यास-आणण्यास मज्जाव ; ‘लम्पी’चे संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लम्पी चर्मरोगाचा (एलएसडी) प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शहरात संक्रमित किंवा संशयित प्राण्याच्या प्रवेशाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने सीमा तपासणी नाक्यावर काटेकोर अंमलबजावणी व कारवाई करण्यासाठी मनपा हद्दीतील गोपालक, पशुपालक, गोरक्षण संस्था आणि दुग्ध व्यावसायिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत गायी, म्हशी शहराबाहेर नेण्यास तसेच शहरात बाहेरून आणण्यास प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण नियम २००९ नुसार महानगर पालिकेद्वारे मज्जाव करण्यात आला आहे. गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. मनपा क्षेत्रात जर गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे, म्हशी, बाधित प्राण्याच्या संपर्कातील त्यांचे वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत, अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यास कोणत्याही व्यक्तीस मज्जाव करण्यात आला आहे. गायी, म्हशी, बैलांचा बाजार भरवणे, शर्यतींचे आयोजन करणे, जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्शन करणे तसेच त्यांच्या एकत्रीकरण करून कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे.

नियंत्रण उपाययोजना करण्याचे आदेश : बाधित प्राण्यांना बाजारपेठ, जत्रा, प्रदर्शन किंवा अन्य प्राण्यांच्या जमावात आणण्यास मनपा क्षेत्रातील गोरक्षण मंदिरं, ट्रस्ट, दुग्धशाळा, गोपालन केंद्रे यांनी तत्काळ लम्पी चर्म रोग नियंत्रण उपाययोजना करावी, असे आदेशही मनपाद्वारे जारी करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...