आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारकीर्द:क्रीडा क्षेत्रात तरुणांना कारकीर्द घडवण्याच्या नामी संधी : बिजवल

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या खेळांमध्ये देश प्रगती करत असून क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या तरुणांना करिअर घडवण्यासाठी अनेकविध संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्राकडे वळवण्याची गरज असल्याचे मत निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विभागीय क्रीडा संकुलातील जिल्हा स्टेडियमवर आयोजित समारंभात व्यक्त केले.

शहरातील विविध मैदानांवर १६ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करून राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने खेळाडूंना सराव मिळाला. हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन अर्थात क्रीडा दिनानिमित्त हॉकी सामना व कार्यक्रमाचे आयोजन पं. जवाहरलाल नेहरू विभागीय क्रीडा संकुलात सोमवारी केले. कार्यक्रमाला पोलिस उपायुक्त विक्रम साळी, क्रीडा उपसंचालक विजयकुमार संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी, पोलिस निरीक्षक राहुल आठवले, इरफान अथर अली, सलीम मिरावाले, मनीष शिरसाठ, शेख इमाम, अविनाश वैद्य, प्रमोद चांदुरकर, संतोष विघ्ने, वैशाली इंगळे, संजय मनवर, संजय कथळकर, अकील शेख, गणेश तांबे उपस्थित होते.

अमरावती विभागीय स्तरावर उत्तमोत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन साळी यांनी केले. अमरावतीच्या क्रीडा वैभवाचा वारसा अधिक उज्ज्वल करण्यासाठी नव्या पिढीने पुढाकार घ्यावा, असे संतान म्हणाले. या वेळी उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांच्या हॉकी सामन्याचे आयोजन केले. ऑलिम्पिकच्या धर्तीवर खेळाडूंनी स्टिक उंचावून फुलांचा वर्षाव करत मान्यवरांना अभिवादन केले. जिल्हा हॉकी असोसिएशनचे सचिव व माजी हॉकी खेळाडू शेख इमाम यांना मेजर ध्यानचंद यांचे छायाचित्र, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरवले. जिल्हा क्रीडा अधिकारी साळवी यांनी प्रास्ताविक केले. संदीप इंगोले यांनी आभार मानले.

एकलव्य धनुर्विद्या अकादमीत क्रीडा दिन
मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीत राष्ट्रीय क्रीडा दिनी धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. १४, १७, १९ वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत ६० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून झाली. या वेळी अकादमीचे मार्गदर्शक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सदानंद जाधव यांनी खेळाडूंनी मिशन २०२४-२०२८ च्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी वाटेल ती तयारी करून ध्येयाकडे वाटचाल करायची असून आपण पूर्ण वेळ खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला एकलव्य अकादमी अध्यक्ष विशाल ढवळे, एकलव्य गुरुकुल स्कूलचे मुख्याध्यापक विलास मारोटकर, व्यवस्थापक अनुप काकडे, अकादमीचे धनुर्विद्या प्रशिक्षक अमर जाधव उपस्थित होते. एनआयएस प्रशिक्षक रोशन सोळंके यांनी खेळाडूंनी आणखी जास्त सराव करून नांदगावचे नाव देशपातळीवर मोठे करावे, अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमासाठी अकादमीचे राष्ट्रीय खेळाडू ऋषिकेश चांदुरकर, प्रतिक पोफळे, प्रीतेश ढोके, उषा राऊत, अश्विनी कोल्हे, वैदेही राठोड, श्रेया खंडार, सानिका चांदुरकर यांनी परिश्रम घेतले.

शहरात प्रथमच हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पर्वावर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले. सायन्सकोर मैदानावर झालेल्या या स्पर्धेत इंडिपेंडंट अकादमीने पंचमुखी फुटबॉल क्लबचा चुरशीच्या अंतिम सामन्यात २-० गोलने पराभव करून जेतेपद पटकावले. अंतिम १५ मिनिटांत क्रिश मेश्रामने दोन्ही सुरेख मैदानी गोल करून संघाला विजेतेपद मिळवून दिले. शहरातील विविध शाळांचे संघ सहभागी झाले होते. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी, क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने, इंडिपेंडंट क्लबचे पदाधिकारी व प्रशिक्षक दिनेश म्हाला, अभिनव म्हाला उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...