आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गणेश मंडळाचाही अमृतमहोत्सव:घाटलाडकी येथील गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांच्या व्याख्यानाला चालना; तरुण गाजवताहेत व्यासपीठ

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच येथील गुरूदेव सेवा मंडळाच्या गणेशोत्सव मंडळदेखील अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. स्वातंत्र्याची ज्योत नागरिकांच्या मनात तेवत ठेवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसात देत समाज जागृतीचे माध्यम म्हणून 1947 साली मंडळाची स्थापना करण्यात आली.

समाज जागृती या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले मंडळ आजही त्याच मार्गाने वाटचाल करीत आहे. विशेष म्हणणे विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्य वाढीस लागून त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग यावे या उद्देशाने गावातील विद्यार्थीच आपल्या व्याख्यानातून समवयस्क विद्यार्थ्यांसह गावातील नागरिकाचे प्रबोधन करीत आहेत. मागील अनेक वर्षांपासून मंडळाद्वारे विविध उपक्रमांसह हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या घाटलाडकी येथे 1947 मध्ये 13 जणांच्या कार्यकारिणीद्वारे गणेशोत्सवाची स्थापना करण्यात आली. ती आजतागयात सुरू असून त्या प्रथम कार्यकारिणीमधील उत्तमसिंह पवार व विठ्ठलराव कपले हयात आहेत. ज्या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला तो आजही कायम असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते.

मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गणेशोत्सवा दरम्यान दररोज वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये रामधून, ग्रामस्वच्छता, वृक्षदिंडी व वृक्षारोपण यासह दहावी व बारावीमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

विद्यार्थी गाजवताहेत व्यासपीठ

यापुर्वी गणेशोत्सवामध्ये व्याख्यानासाठी बाहेरून वक्त्यांना आमंत्रित करण्यात येत होते, परंतु गावातील विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व गुण वृद्धिंगत व्हावा, त्यांच्यातूनच चांगले वक्ते घडावेत, तसेच त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग यावे या उद्देशाने इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थ्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे. हेच विद्यार्थी आता लहान, थोरांचे प्रबोधन करीत आहेत. बाल कलाकारांसाठी वेशभूषा स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन गणेशोत्सवादरम्यान करण्यात येते.

गणेशोत्सवाची संस्थापक कार्यकारिणी

गोपालसिंह परिहार, नत्थुजी राजस, महादेव राजस, विठ्ठल कपले, रामराव धाडसे, दौलत लेवरकर, गेंदाराम धुर्वे, नारायण कपले, लक्ष्मणराव निमकर, लक्ष्मणराव कपले, नारायणराव तायडे, शंकरराव राजस, गोविंदराव राजक, शंकरराव भडांगे, उत्तमसिंह पवार व बंकरसिंह पवार यांनी गणेशोत्सवाची सुरूवात केली होती.

बातम्या आणखी आहेत...