आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुन्या पेन्शनसह प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीकडे शासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष धगधगत अाहे. त्यामुळे मंगळवारपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात दर्यापूर तालुक्यातील विविध शासकीय, निमशासकीय विभागाच्या संघटना सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील बहुतेक सर्वच शाळा, शासकीय निमशासकीय कार्यालये अधिकारी - कर्मचाऱ्यांविना ओस पडल्याचे चित्र होते.
सर्व कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयापुढे घोषणाबाजी व आंदोलन केले. या संपात प्रामुख्याने जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर बुरघाटे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुकाध्यक्ष तुळशीदास धांडे, राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष अनिल भारसाकळे, सतीश वानखडे, पद्माकर खाडे, अहमद शकील, अध्यक्ष शराफतउल्ला, अरविंद चऱ्हाटे, विष्णू राठोड, सविता ढाकरे, संगीता कोकाटे, बाळासाहेब आगे, विठ्ठल घुगे, गजानन गोहत्रे, कमलाकर घोंगडे, महसूल कर्मचारी संघटना तालुकाध्यक्ष विनोद जाधव, आरोग्य सेवा कर्मचारी संघटना तालुकाध्यक्ष विनोद चव्हाण, विदर्भ उपविभागीय पटवारी संघटना तालुकाध्यक्ष सौरभ वानखडे, राज्य नवनिर्मित नरसी संघटना तालुकाध्यक्ष अनुपमा गवई, आदी सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.