आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक त्रस्त‎:मलकापूर पांग्रा-दुसरबीड रस्त्याची समृद्धी‎ महामार्गापर्यंत दुर्दशा; नागरिक त्रस्त‎

मलकापूर पांग्रा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर पांग्रा ते दुसरबीड या‎ ९ किलोमीटरच्या रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले‎ अाहे. त्यातच मलकापूर पांग्रा येथून चार किलोमीटर‎ अंतरावरून समृद्धी महामार्गापर्यंत जाणारा रस्ता‎ खचला आहे. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता‎ निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाने मात्र याकडे‎ दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. समृद्धी मार्गाचे काम‎ सुरू असताना अवजड वाहनांची वर्दळ होती.‎ त्यामुळे मलकापूर पांग्रा ते समृद्धी मार्गालगतचा‎ रस्ता पूर्णपणे खचला अाहे. येथून पाच किमी.‎

अंतरावर समृद्धी मार्गावर प्रवेशासाठी इंटरचेंज‎ देण्यात आला आहे. या रस्त्यावर जागोजागी‎ मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. ते अपघातांना‎ निमंत्रण देणारे ठरत असून, दुसरबीडला जाणाऱ्या‎ नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.‎ त्यामुळे बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन‎ रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...