आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढा:ग्रेड-पे वाढवण्यासाठी तहसीलदारांसह‎ नायब तहसीलदारांचे धरणे आंदोलन‎ ; आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने

अमरावती‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग-२‎ यांचे ग्रेड पे वाढवण्याकरिता‎ तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी‎ सोमवारी धरणे देत विभागीय आयुक्त‎ कार्यालयासमोर निदर्शने केली. या‎ आंदोलनात विभागातील साडेचारशे‎ उपजिल्हाधिकारी संवर्गातील‎ अधिकाऱ्यांसह तहसीलदार व नायब‎ तहसीलदारांचा समावेश होता.‎ शेवटच्या टप्प्यात ३ एप्रिलपासून‎ संघटनेच्या वतीने बेमुदत संप‎ पुकारण्याचा इशारा दिला आहे.‎ महाराष्ट्र राज्यातील महसूल‎ विभागातील नायब तहसीलदार,‎ राजपत्रित वर्ग-२ हे अत्यंत महत्त्वाचे‎ पद आहे, परंतु नायब तहसीलदार या‎ पदाचे वेतन राजपत्रित वर्ग-२ चे‎ नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार व‎ नायब तहसीलदार संघटना यांनी नायब‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तहसीलदार यांचे ग्रेड पे‎ वाढवण्याकरिता आंदोलनाचा पवित्र‎ घेतला आहे. सन १९९८ पासून याकरिता‎ शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू‎ आहे.

संघटनेच्या मागणीचा कोणताही‎ विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे‎ सोमवारी विभाग स्तरावर एक दिवसीय‎ रजा घेऊन धरणे आंदोलन करण्यात‎ आले. विभागीय आयुक्त‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कार्यालयासमोर महसूल विभागातील‎ पाच जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे‎ अधिकारी आंदोलनात सहभागी झाले‎ होते. या आंदोलनाचे नेतृत्व विभागीय‎ अध्यक्ष प्रवीण ठाकरे, सचिव संजय‎ खडसे, जिल्हाध्यक्षा तहसीलदार निता‎ लबडे यांनी केले. आंदोलनात‎ तहसीलदार वैभव फरतारे,‎ उपजिल्हाधिकारी रणजित भोसले,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नितीन व्यवहारे, दिलीप वानखडे,‎ सहायक आयुक्त विवेक काळकळ,‎ राम लंके, अारडीसी विवेक घोडके,‎ वैशाली पाथरे, निकिता जावरकर, रवी‎ महाले, श्याम देशमुख, अरविंद‎ मालपे, श्यामकांम मस्के, सुनील‎ रावेकर, प्रवीण देशमुख आदींसह पाच‎ जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश‎ होता.‎

बातम्या आणखी आहेत...