आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरीप हंगामासाठी कर्जपुरवठ्याची प्रक्रिया राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. पावसाला सुरूवात झाली असून, अधिकाधिक गरजू शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी वितरणाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी मंगळवार १४ रोजी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल भवनात बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खरीप पत-पुरवठ्याचा आढावा घेतला. जिल्हा उपनिबंधक राजेश लव्हेकर, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक जितेंद्र कुमार झा यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कर्जपुरवठ्याचे १ हजार ४०० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ८३३ कोटींहून अधिक रकमेची कर्जप्रकरणे मंजूर असून, संपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामाला गती द्यावी. कुठेही तांत्रिक व प्रशासकीय अडचणी येत असतील तर त्यावर तत्काळ तोडगा काढावा, कोणत्याही परिस्थितीत कर्ज वितरणाची प्रक्रिया मंदावता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.