आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांमध्ये जनजागृती:अटल भूजल योजनेबाबत कलापथकाद्वारे जनजागृती

मोर्शी10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षेण आणि विकास यंत्रणा कार्यालयाकडून अटल भूजल योजनेंतर्गत मोर्शी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसह एकूण ४९ गावांमध्ये अटल भूजल योजना रबावण्यात येत आहे. त्या अनुषंगाने माहिती व प्रसार मंत्रालय भारत सरकार यांच्या केंद्रीय संचार ब्युरो अंतर्गत राज्यात अटल भूजल योजनेंतर्गत अमरावती येथील कलादर्पण बहुद्देशीय संस्थेच्या कलापथकाद्वारे ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली जात आहे.

या माध्यमातून नागरिकांमध्ये भुजल बचतीचे महत्त्व व त्याकरिता केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर पाणी बचत साक्षरता, कमी पाण्यातील पिकाचे मार्गदर्शन, ठिबक व तुषार सिंचनाचा कसा जास्ती जास्त वापर करता येईल, यावर भर देण्यात आला असून त्यांना ऑनलाईन अर्ज करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. यासाठी सरपंच कल्याणी राजस, उपसरपंच उषा नागले, रोशन मानकर आदी उपस्थित होते.