आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:‘श्री बुधभूषणम्’ संस्कृत ऐतिहासिक हस्तलिखित ग्रंथाचे थाटात प्रकाशन; इतिहास संशोधक प्रा. शरद गोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजी महाराज यांचे व्यक्तिमत्त्व जगातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींसाठी ३५० वर्षांपासून आकर्षणाचा आणि औत्सुक्याचा विषय राहिला आहे. संभाजीचे कार्य सर्वसामान्य माणसाला कळावे, यासाठी अजय लेंडे यांनी २५० वर्षापूर्वीचे संभाजी महाराज रचित ‘श्री बुधभूषणम्’ हा संस्कृत ग्रंथाचे पुनर्लेखन करून हस्तलिखित ग्रंथ निर्माण केला. या ऐतिहासिक हस्तलिखित ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी थाटात झाले. स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे हा ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

मराठा सेवा संघाचे संस्थापक अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाला माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, राज्यमंत्री बच्चू कडू, विधान परिषद सदस्य अॅड.किरण सरनाईक, आमदार सुलभा खोडके, आ. डॉ.पंकज भोयर, आ. प्रताप अडसड, सुप्रसिद्ध इतिहास संशोधक तथा अ.भा.मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. शरद गोरे, इतिहासकार डॉ. अशोक राणा, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे, अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक सुधाकर भारसाकळे, ग्रंथ निर्माते अजय लेंडे, अरविंद गावंडे, प्रदीप अंधारे, प्रा. डॉ. रमेश अंधारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अत्यंत ऐतिहासिक, तेवढेच प्रेरणादायी अशा या कार्यक्रमाला हजारो शिव, शंभू प्रेमींची उपस्थिती होती.

यावेळी जगातील प्रथम हस्तलिखित बुधभूषणम् ग्रंथ प्रकाशन सोहळ्याची सुरुवात जिजाऊ वंद नेने झाली. तसेच १२४ किलो वजनाचा हस्तलिखित ग्रंथाचे विचार पीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हा अमरावती करांसाठी ऐतिहासिक क्षण ठरला. याशिवाय ग्रंथाची निर्मिती व संकल्पना असलेले अजय लेंडे आणि हस्त लेखन करणारे सचिन पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना अॅड. पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार देशभरात पोहोचवण्याचे काम मराठा सेवा संघ करत आहेत. बुधभूषणम् ग्रंथाचा हा सोहळा ऐतिहासिक आहे हा ग्रंथ येणाऱ्या काळात सर्वांपर्यंत पोहोचण्याकरता राज्यभरात ग्रंथ दिंडीचे आयोजनही करण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच सिंदखेड राजा येथे ग्रंथ ठेवण्यासाठी आमदार निधीतून एक हायटेक सभागृह बांधण्यासाठी निधीची मागणी राज्य शासनाकडे करु, असे ते म्हणाले. यावेळी प्रा. नरेश पाटील, प्रा. भैय्या साहेब मेटकर, प्रा. जयंत इंगोले, प्रा. अमोल बारब्दे, प्रा. डॉ. प्रफुल्ल गुडधे, प्रा. डॉ. बाळासाहेब गावंडे, आश्विन चौधरी, प्रा. डॉ. प्रकाश तायडे सह छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती सर्व सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.कीर्ती काळमेघ यांनी केले.

संभाजी महाराजांचे विचार देशभरात पोचवणे काळाची गरज: राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, संभाजी महाराज लिखित बुधभूषणम् ग्रंथ हस्तलिखीत करण्याचे महान कार्य अजय लेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. संभाजी महाराजांचा विचार हा देशभरात पोहचणे काळाची गरज आहे. त्यानिमित्त बुधभुषणम् ग्रंथातील विचार देशभरात पोहचविण्यासाठी प्रयत्न करु. याकरीता राज्य निधी उपलब्ध करुन देण्याचे काम केल्या जाईल. तसेच राज्यातील सरकारी रुग्णालयांची दशा वाईट असून येणाऱ्या काळात मराठा सेवा संघ आणि प्रहार संघटनेच्या माध्यमातून रुग्णालय दत्तक घेण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी त्यांनी ग्रथाच्या निर्मितीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने १ लाख रुपयांची देणगीही जाहीर केली.

बातम्या आणखी आहेत...