आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1500 क्विंटल हरभऱ्याची एकाच दिवशी खरेदी:धामणगाव रेल्वे येथे नाफेडची खरेदी; उद्दीष्ट पुर्णत्वामुळे शेतकरी खरेदीपासून वंचित राहणार

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धामणगाव रेल्वे येथील खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून गुरूवारी (ता. 16) सुरू झालेल्या नाफेडच्या हरभरा खरेदीतून दीड हजार क्विंटलच्या वर मालाची खरेदी करण्यात आली असून शासनाकडून आलेले सत्तावीसशे क्विंटलचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना शासकीय हरभरा खरेदीपासून वंचित राहावे लागणार आहे.

3 जून पासून बंद पडलेले केंद्राचे ऑनलाईन पोर्टल सुरू झाले आहे. मात्र सत्तावीसशे क्विंटलचे उद्दिष्ट देऊन विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने (व्हीसीएमफ) खरेदीला परवानगी दिली आहे. खरेदी केंद्रावर गुरूवारी 1 हजार 578 क्विंटल 78 किलो हरभऱ्याची मोजणी करून खरेदी करण्यात आली.

तालुक्यातील एकूण 4 हजार 9 शेतकऱ्यांपैकी 1 हजार 481 शेतकऱ्यांचा हरभरा आद्यपही एसएमएस न गेल्याने घरात पडून आहे. अचानक खरेदी बंद पडल्याने खरेदी यार्डवर या पुर्वीच पडून असलेला 150 ते 200 शेतकऱ्यांपैकी काहीच शेतकऱ्यांचा हरभरा दीड हजार क्विंटलच्या वर मोजला गेल्याने आता सत्तावीसशे क्विंटलच्या च्या उद्दिष्टपैकी उर्वरित 1 हजार 122 क्विंटल हरभऱ्याची खरेदी बाकी आहे. त्यामुळे शासनाने हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...