आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Purchase Of One And A Half Thousand Quintals Of Gram In A Single Day At Dhamangaon; The Target Of 2700 Quintals Will Be Achieved Soon |marathi News

हरभऱ्याची खरेदी:धामणगाव येथे एकाच दिवसात दीड हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी; 2700 क्विंटलचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होणार

धामणगाव रेल्वे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून गुरूवारी (दि. १६) सुरू झालेल्या नाफेडच्या हरभरा खरेदीतून दीड हजार क्विंटल च्या वर मालाची खरेदी करण्यात आली असून शासनाकडून आलेले सत्ताविसशे क्विंटलचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना शासकीय हरभरा खरेदीपासून वंचित राहावे लागणार आहे.

३ जूनपासून बंद पडलेले केंद्राचे ऑनलाइन पोर्टल सुरू झाले आहे. मात्र सत्ताविसशे क्विंटलचे उद्दिष्ट देऊन विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने (व्हीसीएमएफ) खरेदीला परवानगी दिली आहे. खरेदी केंद्रावर गुरुवारी १ हजार ५७८ क्विंटल हरभऱ्याची मोजणी करून खरेदी करण्यात आली. तालुक्यातील एकूण ४ हजार ९ शेतकऱ्यांपैकी १४८१ शेतकऱ्यांचा हरभरा अद्यापही ‘एसएमएस’ न गेल्याने घरात पडून आहे.

गुरूवारी १५०० क्विंटलवर खरेदी
‘व्हीसीएमएफ’ने दिलेल्या आदेशानुसार २ हजार ७०० क्विंटल हरभरा खरेदी करावयाचा आहे. यापूर्वी यार्डवर असलेल्या मालापैकी १ हजार ५७८ क्विंटल हरभऱ्याची गुरुवारी (दि. १६) खरेदी करण्यात आली. शिल्लक असलेल्या १४८१ शेतकऱ्यांपैकी शुक्रवारच्या खरेदीसाठी मोजक्याच शेतकऱ्यांना निरोप दिला आहे.
-मारोती बोकडे, व्यवस्थापक, खविस संस्था, धामणगाव रेल्वे

बातम्या आणखी आहेत...