आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्दीची दक्षता:क्यूआर कोड पॅटर्न ठरतोय प्रभावी, रात्रीच्या घरफोड्यांमध्ये ३ टक्के घट

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेषत: शहरात ‘क्यूआर कोड’ लावण्यात आले आहेत. रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी या ठिकाणी जात क्यूआर कोड स्कॅन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे रात्री गस्तीदरम्यान कामचुकारपणावर आळा बसला आहे. सद्यःस्थितीत जिल्हाभरात ५१२ क्यूआर कोड लावले आहेत. हा पॅटर्न प्रभावी ठरल्यामुळे जिल्ह्याच्या शहरी भागात (अमरावती शहर वगळता) रात्री दरम्यानच्या चोरीच्या घटनेत ३ टक्क्यांनी घट झाली आहे. विशेष म्हणजे हा पॅटर्न लागू झाल्यापासून मागील आठ महिन्यात जिल्ह्यात घरात शिरुन दरोड्याचा एकही गुन्हा घडला नाही.

चोरी, घरफोडीचे बहुतांश गुन्हे रात्री घडतात. अशावेळी रात्रगस्त प्रभावी ठरण्यासाठी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी आठ महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये महत्वाच्या ठिकाणी क्यूआर कोड लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या आठ ते नऊ महिन्यात ग्रामीण भागात रात्रीच्या चोरी, घरफोडीच्या घटनांत घट झाली आहे.

गावाचे नाव गुन्हे वरुड ०४ परतवाडा ११ धारणी ०३ अंजनगाव ११ तळेगाव दशासर ०१ तिवसा ०२ दत्तापूर (धामणगाव) ०४ मोर्शी १४ दर्यापूर ०३ पथ्रोट ०१ चांदूर रेल्वे ०८ अचलपूर ०५ नांदगाव खंडेश्वर ०१ लोणी ०२ बेनोडा ०४ सरमसपुरा ०१ चांदूर बाजार ०१ रहिमापूर ०१ शिरजगाव ०१ एकूण ७८

काय आहे क्यूआर कोड पॅटर्न?
ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील प्रत्येक ठाण्यातील पोलिसांना रात्रगस्त करावी लागते. ठाण्याच्या हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणावर क्यूआर कोड चिकटवण्यात आले आहेत. रात्रगस्तीवर असलेले पथक या क्यूआर कोडजवळ जावून सेल्फी सोबतच कोड स्कॅन करतात. यासाठी एक विशिष्ट अॅप्लिकेशन पोलिसांच्या स्मार्ट फोनमध्ये आहे. संबधित पोलिसाने स्कॅन व सेल्फी घेतला की, तो तत्काळ मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या सिस्टिममध्ये येतो. त्यामुळे कोणते अधिकारी, कर्मचारी किती वाजता, कुठे गस्त घालत आहेत हे माहिती होते. शिवाय हा संपूर्ण लेखाजोखा दरदिवशी सकाळी साडेआठ वाजता पोलिस अधीक्षकांसमोर राहतो. त्यामुळे रात्रगस्त असतानाही गस्त घातली नसेल तर ते चटकन थेट पोलिस अधीक्षकांनाच समजते, त्यामुळे हा पॅटर्न प्रभावी ठरत आहे.

बातम्या आणखी आहेत...