आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील खोडगाव रोडवरील स्मशानभूमीलगत भावलिंग परिसरात नागपंचमीच्या दिवशी मोठा जुगार भरला होता. या जुगारात झालेल्या भांडणाची तक्रार पोलिसात गेली. परंतु ते येण्याची चाहूल लागताच जुगारी पळून गेले. त्यांच्या दुचाकी मात्र तेथेच पड दरवर्षी भरणाऱ्या या जुगाराकडे पोलिससुद्धा कानाडोळा करतात. परंतु यावर्षी येथे भांडण होऊन ते पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने पोलिसांना त्याची दखल घ्यावीच लागली. परंतु ते येताच सर्व जुगारी मिळेल त्या रस्त्याने पळून गेले. या धावपळीत त्यांची वाहने मात्र तेथेच होती.
त्यामुळे घटनास्थळावरून पोलिसांनी सुमारे २५ दुचाकी जप्त केल्या. वृत्त लिहिस्तोवर कुणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता. ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात दुय्यम ठाणेदार चंद्रकला मेश्रे यांच्यासह डीबीच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अक्षय तृतीया, नागपंचमी, होळी आदी सणांच्या वेळी गावाबाहेर जुगाराचा डाव मांडण्याची प्रथा आहे ती आजही परंपरागत सुरुच आहे.
विहिरीतून युवकाला काढले
पोलिस येताच झालेल्या पळापळीत एक युवक विहीरीत जाऊन पडला. डीबी स्काॅडचे गोपाल सोळंके यांना विहिरीतून ‘वाचवा वाचवा’ असा आवाज आल्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरु केली. त्यानंतर त्या तरुणाला दोराच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढण्यात आले. याकामी विजय शेवतकर, विजय निमखंडे, विशाल थोरात आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना मदत केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.